Home /News /mumbai /

Omicron च्या वाढत्या संसर्गात आणखी एक डोकेदुखी; मुंबईत आढळला Black Fungus चा रुग्ण

Omicron च्या वाढत्या संसर्गात आणखी एक डोकेदुखी; मुंबईत आढळला Black Fungus चा रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या (Covid-19 Pandemic) रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली असली तरी त्याचा धोका टळला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

    मुंबई, 28 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या (Covid-19 Pandemic) रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली असली तरी त्याचा धोका टळला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,425 नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे या कालावधीत 36,708 लोकही बरे झाले आहेत, तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण 2 लाख 87 हजार 397 झाले आहेत. त्याचवेळी, मुंबईत (Mumbai) गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1,384 नवीन रुग्ण आढळले असून 5686 बरे झाले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 18,040 सक्रिय रुग्ण आहेत. कोविड प्रकरण कमी होऊन मुंबईकरांचा त्रास संपलेला नाही. मुंबईत ब्लॅक फंगसचे (Black Fungus) पहिले प्रकरण समोर आले आहे. येथे 5 जानेवारी रोजी एका 70 वर्षीय वृद्धाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. या रुग्णामध्ये ब्लॅक फंगसची लक्षणे दिसू लागली. रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्लॅक फंगसमुळे दुसऱ्या लाटेत निर्माण झाली होती दहशत 2021 मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ब्लॅक फंगसच्या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. कोविड-19 साथीच्या आजारातून बरे झाल्यानंतर अनेक लोक Mucormycosis किंवा ब्लॅक फंगसचे बळी ठरले. या आजारामुळे अनेकांचे डोळे आणि इतर अवयव निकामी झाले आणि त्यामुळे अनेकांचा मृत्यूही झाला. आता Omicron व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतही लोकांना पुन्हा एकदा ब्लॅक फंगसची लागण होऊ लागली आहे. या रुग्णांना ब्लॅक फंगसचा धोका सर्वाधिक ब्लॅक फंगसने ग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अंधत्व, अवयव निकामी होणे आणि मृत्यू होण्याची शक्यता असते. उच्च रक्तातील साखरेचे प्रमाण असलेले कोविड रुग्ण आणि जे दीर्घकाळ स्टेरॉईड घेत आहेत त्यांना ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका असतो. याशिवाय कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण किंवा अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्णही या आजाराचे बळी ठरू शकतात. ब्लॅक फंगसची लक्षणे ब्लॅक फंगस हा एक रोग आहे जो कोणत्याही बॅक्टिरिया आणि व्हायरसमुळे होत नाही तर विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे होतो. हा एक प्रकारचा धोकादायक संसर्ग आहे. डोळ्यात जळजळ होणे, चेहरा, नाक किंवा डोळ्यांजवळील त्वचा काळी पडणे, तीव्र डोकेदुखी आणि चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला सूज येणे ही त्याची लक्षणे आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या