कोरोना: मृत्यू झालेल्या 10 जणांचे मृतदेह अंत्यविधीविना पडून, भाजप नेत्याचा आरोप

कोरोना: मृत्यू झालेल्या 10 जणांचे मृतदेह अंत्यविधीविना पडून, भाजप नेत्याचा आरोप

महानगरपालिका क्षेत्रातीव कोरोनाबाघित रुग्णांच्या संख्येसह मृतांचा आकडाही झपाट्यानं वाटत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. महानगरपालिका क्षेत्रातीव कोरोनाबाघित रुग्णांच्या संख्येसह मृतांचा आकडाही झपाट्यानं वाटत आहे. मात्र, कोरोनामुळे मृत पावलेल्या 10 रुग्णांचे मृतदेह केईएम रुग्णालयात अंत्यविधीविना तसेच पडून आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

केवळ भोईवाडा विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे ही अडचण निर्माण होत असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबईतील सर्व विद्युतदाहिनीचा वापर केला जावा, असं पत्र प्रभाकर शिंदे यांनी आयुक्त प्रवीण परदेशी यांना लिहिले आहे.

हेही वाचा.. बापरे! सलाईनच्या बॉक्समध्ये ठेवल्या दारूच्या बाटल्या, पोलिसांनी केला पर्दाफाश

प्रभाकर शिंदे यांनी सांगितलं की, मुंबईत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट केवळ भोईवाडा स्मशानभूमीमधील विद्युतदाहिनीत करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. कोरोनामुळे मृत होणाऱ्या संशयित रुग्णांचा देखील यात  समावेश आहे. असे संशयित रुग्ण, त्यांचा नाक व घसा यातून स्वॅबद्वारे घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल येण्यापूर्वीच मृत झाले आहेत. कोरोनाचा अधिक संसर्ग टाळण्यासाठी अशा सर्व मृतदेहांची तातडीने विल्हेवाट लावणे गरजेचं आहे.

मुंबईत विद्युतदाहिन्यांची सुविधा उरलब्ध असलेला 8 ते 10 स्मशानभूमी असताना केवळ भोईवाडा येथील एकाच स्मशानभूमीमधील विद्युतदाहिनी सदर मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी निर्देशित केल्यामुळे मृतदेहांच्या विल्हेवाटीस विलंब होत आहे. केईएम रुग्णालयात स्वॅबव्दारे घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत पावलेल्या सुमारे 10 संशयित कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह अंत्यविधीविना पडून आहेत. ते अत्यंत धोकादायक असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा....तर कोरोना त्यांच्या जीवावर बेतू शकतो, असं म्हणत राज ठाकरेंनी केली ही मागणी

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांच्या विल्हेवाटीसंबंधीच्या पद्धतीत सुधारणा करुन मुंबई महापालिकेच्या विद्युतदाहिन्यांची सुविधा उपलब्ध असलेल्या सर्वच स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याचे निर्देश तातडीने द्यावेत, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 28, 2020, 6:47 PM IST

ताज्या बातम्या