कोरोना व्हायरसचा असाही साईड इफेक्ट, कोंबड्याऐवजी चोरत होते बकऱ्या पण...

कोरोना व्हायरसचा असाही साईड इफेक्ट, कोंबड्याऐवजी चोरत होते बकऱ्या पण...

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 24 फेब्रुवारी :  कोरोना व्हायरसमुळे चिकनवर संकट आल्याने खवय्यांनी बकऱ्याच्या मटनाकडे वळाल्याने मटणाची मोठी मागणी होत आहे. परिणामी बकरी चोरीच्या घटनात वाढ होत असल्याची बाब समोर आली आहे. बकरी चोरणाऱ्या एका चोरट्याला बकरी मालकाच्या प्रसंगावधनाने अटक करण्यात आली आहे.

भिवंडीतील काटई गाव येथील मोकळ्या मैदानात ही घटना घडली आहे. चरण्यासाठी आलेल्या बकऱ्या चोरी करण्याच्या उद्देशाने रिक्षात टाकून पळ काढत असतांना बकरी मालकाच्या प्रसंगावधनाने साथीदारांच्या मदतीने बकरी मालकाने या बकरी चोरांच्या मुसक्या आवळून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.  याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तिघा बकरी चोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

राहील नबीद अंबिलकर ( रा. ईदगाह ) , सईम सलीम कुवारी ( रा. बंदर मोहल्ला ) आणि आफान इस्माईल एलेकर ( रा . ईदगाह ) अशी बकरी चोरी प्रकरणी अटक केलेल्या बकरी चोरांची नावं आहे. या चोरट्यांनी काटई बाग परिसरातील अमीनाबाग मस्जिद समोरील मोकळ्या मैदानात तीन बकऱ्या चरत होत्या. शेजारी कुणी नसल्याचं साधून रिक्षा क्रमांक MH 04 HZ 2010 मधून आलेले राहील आणि सईम सलीम तसेच दुचाकीवरून आलेला आफान यांनी या तिन्ही बकऱ्या चोरी करण्याच्या उद्देशाने आपल्या रिक्षात टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी बकऱ्यांचा मालक कपिल सखाराम घरत यांना समजले असता त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने या तिघांना बकऱ्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर निजामपुरा पोलीस ठाण्या  तिघांविरोधात बकऱ्या चोरी प्रकरणी तक्रार दिली असता पोलिसांनी तिघांविरोधात भादंवि कलम  379, 511, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करून तिघांना अटक केली आहे.

आठ महिन्याच्या बाळाच्या रडण्यामुळे समोर आला आईच्या हत्येची घटना, पती फरार

दरम्यान, भिवंडी शहरातील श्रीरंगनगर परिसरात राहणाऱ्या पती- पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने आठ महिन्याच्या बाळासमोरच पत्नीच्या गळा  आवळून हत्या केल्याची घटना  घडली आहे. सपना अरविंद केशरवानी ( वय 27 ) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव असून बाळाच्या रडण्यामुळे हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पदमानगर भागातील श्रीरंगनगर येथील इमारतीत मयत सपना पती अरविंद पुरुषोत्तम केसरवानी याच्यासोबत राहत होती. अरविंद  हा वेताळपाडा इथं ओम साई नावाचे मोबाईल दुकान चालवत होता. रविवारी  सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले असता संतप्त झालेल्या पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नी सपनाच्या गळ्या भोवती ब्लॅंकेट आवळून आणि तोंडावर उशी दाबून तिची हत्या करून तो पसार झाला. त्यांना एक मुलगी आणि आठ महिन्याचा मुलगा असून मुलगी गावी आहे. मात्र, हत्या झाल्यानंतर आठ महिन्याचा मुलगा रडू लागल्याने त्याचा आवाज शेजारील नागरिकांना आला असता त्यांनी पाहणी केली. मात्र, घराला कुलूप असल्याने त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुलूप तोडून पाहणी केली असता सपना यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

या घटनेची माहिती  समजल्यावर मयत सपनाचे वडील राजेंद्रकुमार गुप्ता यांनी धाव घेऊन याबाबत शहर पोलीस ठाण्यात  पतीवर  हत्येचा गुन्हा  दाखल केला.   फरार पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

या अगोदर सुद्धा अरविंदने सपना हिला मारहाण केली होती. या प्रकरणी पतीवर गुन्हाही दाखल केला होता. मात्र, गोडी गुलाबीने तो गुन्हा सपना हिला मागे घेण्यास भाग पाडलं होतं. आरोपी अरविंद हा सपना सोडण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती समोर आली आहे.

First published: February 24, 2020, 9:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading