Home /News /mumbai /

मुंबईत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही, BMCचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही, BMCचा महत्त्वाचा निर्णय

Corona vaccination : अनेक राज्यांनी मोफत कोरोना लशीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. पण मुंबई महापालिकेने याबाबत निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 27 एप्रिल : अनेक राज्यांनी 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं मोफत कोरोना लसीकरण (Corona vaccination) करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही सध्या याबाबत विचार सुरू आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य सरकार मोफत कोरोना लस (Corona vaccine) देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशात मुंबई महापालिकेने (BMC) कोरोना लसीकरणाबाबत (Corona vaccination in mumbai) मात्र मोठा निर्णय घेतला आहे. 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 1 मेपासून कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळेल. खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना त्याचे पैसे द्यावे लागतील आणि आता मुंबई महापालिकेने (Greater Mumbai Municipal Corporation) 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना खासगी रुग्णालयातच लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना फक्त खासगी रुग्णालयात लस मिळेल, असं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. मुंबईत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही, हे BMC ने स्पष्ट केलं आहे. हे वाचा - मुंबईच्या माजी महापौरांनी सांगितल्या कोरोना विरुद्ध लढाईचा सोपा मार्ग महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं, 18 ते 45 वयोगटातील मुंबईत जवळपास 9 दशलक्ष नागरिक आहेत. त्यांचं लसीकरण करण्यासाठी जवळपास 1.80 कोटी लशीच्या डोसची गरज आहे. लसीकरण मोहिमेची व्याप्ती, लशीचा पुरेशा साठा, मागणी, वाहतूक आणि पुरवठा आणि लसीकरण केंद्र या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. याबाबत सरकार आणि लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर लसीकरणाची पुढची दिशा ठरेल. हे वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना महापालिका आणि सरकारी केंद्रात लस दिली जाईल. पण 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मुंबईतील खासगी रुग्णालयातच लस घेता येईल, असं चहल यांनी सांगितलं. कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं चहल म्हणाले. खासगी रुग्णालयात लस म्हणजे या नागरिकांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार. हे वाचा - राज्यात लॉकडाऊन वाढण्याची चिन्ह, उद्या होणार अंतिम निर्णय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्डची किंमत राज्य सरकारसाठी प्रति डोस  400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये आहे. जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस आपली असल्याचं सीरमने सांगितलं आहे. तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये आहे. पण ही किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे ही किंमत आणखी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. लस उत्पादक कंपन्यांना लशीची किंमत कमी करण्याची विनंती केंद्राने केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या