Home /News /mumbai /

मोठी बातमी, मुंबईत कोरोना लशीचा साठा ठेवण्याची जागा निश्चित

मोठी बातमी, मुंबईत कोरोना लशीचा साठा ठेवण्याची जागा निश्चित

मुंबई महापालिकेनं कोरोना लस साठवणुकीसाठी कांजूरमार्ग ते भांडुप या परिसरात एका जम्बो कोल्ड स्टोरेजची जागा निश्चित केली आहे.

मुंबई, 30 नोव्हेंबर : कोरोना व्हॅक्सिन (corona vaccine)कधी बाजारात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेनं (mumbai municipal corporation)आता कोरोनाची लस आल्यानंतर तिची साठवणूक कुठे करायची याबद्दल जागाही निवडली आहे. कोरोनाच्या लशीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जगात थैमान घालणाऱ्या कोरोनावर अखेर पुण्यातील सीरम संस्थेनं लस शोधून काढली आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी सीरम संस्थेची पाहणी केली आहे. त्यामुळे  कोरोना व्हॅक्सिनचे बाजारात कधी वितरण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मुंबई पालिकेनंही कोरोनाच्या लस वितरणासाठी मोर्चेबांधणी केली आहे.  मुंबई महापालिकेनं कोरोना लस साठवणुकीसाठी कांजूरमार्ग ते भांडुप या परिसरात एका जम्बो कोल्ड स्टोरेजची जागा निश्चित केली आहे. लशीसाठी तापमान हे वेगवेगळ्या अंशावर ठेवावे लागते. त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणावर लशीची एका ठिकाणी साठवणूक करता यावी यासाठी महापालिका पश्चिम पूर्व उपनगर आणि शहर परिसर अशा तिन्ही ठिकाणी जागेचा शोध घेत होती. त्यापैकी भांडुप, कांजूरमार्ग या परिसरात आता जागेची निश्चिती करण्यात आलेली आहे. शहरापासून जवळच असल्यामुळे मोठ्या वाहनांची ये-जा करण्यास सोईचे ठरणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये आणि मुंबई बाहेर लशीचा पुरवठा करण्यास सोपे ठरणार आहे. 5 दिवसांत आतापर्यंत 150 जण कोरोना पॉझिटिव्ह दरम्यान, मुंबई महापालिकेने गेले काही दिवस जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या कोरोना चाचणीवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार बाजारात काम करणारे दुकानदार, फेरीवाले, बस ड्रायव्हर, कंडक्टर अशा लोकांची मोफत चाचणी करण्यात आली.  या चाचणीमध्ये 5 दिवसांत आतापर्यंत 150 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलेली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसू लागली होती. यासाठी मुंबई महापालिकेनं स्वतः जी लोकं सर्वात जास्त लोकांच्या संपर्कात येतात, अशा घटकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या