Home /News /mumbai /

लॉकडाउन 2.0 च्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण!

लॉकडाउन 2.0 च्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण!

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा लॉकडाउन (Lockdown 2.0)लागणार अशी चर्चा रंगली आहे. राजकीय नेत्यांनी या बद्दल शक्यता वर्तवली आहे. पण, वैद्यकीय क्षेत्रातून याला विरोध होत आहे.

    मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लागणार का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी सुद्धा 'लॉकडाउन लावण्याची परत वेळ येऊ देऊ नका' असं आवाहन केले आहे. पण लॉकडाउन 2.0 ची तलवार ही मात्र कायम आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन लागणार अशी चर्चा रंगली आहे. राजकीय नेत्यांनी या बद्दल शक्यता वर्तवली आहे. पण, वैद्यकीय क्षेत्रातून याला विरोध होत आहे. फक्त धास्ती आहे म्हणून लॉकडाउन लावणे योग्य नाही, असं ठाम मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जरी हळूहळू वाढत असली तरी संख्या ही लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवता येईल. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना आखल्या पाहिजे. लॉकडाउन करून प्रश्न सुटणार नाही, असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधानांसोबत बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले... 'लॉकडाउन लागू केल्यामुळे कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण प्रक्रियेला वेळ मिळतो. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लॉकाडाउनच्या पर्यायाचा विचार करावा लागतो. लॉकडाउनमुळे आरोग्य यंत्रणेला पूर्वतयारी करण्यात मदत मिळते',  असं टास्क फोर्स समितीमधील सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले तर दिवाळीनंतर वाढलेल्या संसर्गाचे प्रमाण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्षात येईल. पण सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करता आली पाहिजे, हेच अत्यंत गरजेचं असणार आहे, असं मत राज्य सरकारने स्थापन केलेल्या मृत्यू दर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले. NCBच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर क्रांती रेडकरची पोस्ट दरम्यान, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार का? असा सवाल मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारला असता त्यांनी लॉकडाउनची शक्यता नाकारली नाही. 'कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही. शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कोरोनाची परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याची सूचना केली आहे. लॉकडाउन लागू करावा की नाही, याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल', असं वडेट्टीवार यांनी सांगितले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारली नाही. तसंच, 'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल', असंही अजित पवारांनी स्पष्ट केले. 'अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितींचा आढावा घेतला जात आहे. आणखी 10 ते 15 दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल', असंही अजित पवार यांनी सांगितले. ..तर ती कोणती मर्दानगी होती? BJP नेत्यानं कंगनावरून संजय राऊतांना पुन्हा डिवचलं राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का? असा सवाल केला असता अजितदादा म्हणाले की, 'परिस्थिती कशा प्रकारची समोर येणार हे त्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही. मी आज काही बोललो तर लोकं जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे.' 'कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल. व्हेंटिलेटर बेड, साधे बेड हे खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर पूर्ण क्षमतेनं सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल', असंही अजित पवार यांनी सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या