• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'कोरोना'ची धास्ती, महाराष्ट्रातील 3 तरूण इराणमध्ये 8 दिवसांपासून बोटीवर अडकले

'कोरोना'ची धास्ती, महाराष्ट्रातील 3 तरूण इराणमध्ये 8 दिवसांपासून बोटीवर अडकले

बोटीवरील 30 कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुटका करण्यात आली. मात्र, आता भारतातील तिघे कर्मचारी अडकले आहेत.

  • Share this:
ठाणे, 20 मार्च : 'कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे इराणमधील अबादान बंदरातील बोटीमधून बाहेर पडण्यास मज्जाव केल्यामुळे ठाण्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील तिघे जण बोटीवरच अडकले आहेत. या बोटीवरील अन्य देशांतील उर्वरित 30 कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुखरुप सुटका करण्यात आली. दरम्यान, या तरुणांची सुटका करण्यात यावी, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. आखातातील अमिर बोटीवर महाराष्ट्रातील विवेक विष्णू माळकर राहणार किसननगर, सौरभ शशिकांत पिसाळ रा. भांडुप आणि अॅंथोनी जॉन पॉल रा. कोल्हापूर अशा तिघांसह 33 कर्मचारी कार्यरत होते. इराणमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अबादान बंदरातील बोटीवरील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास तडकाफडकी बंदी घालण्यात आली. त्यामुळे 8 दिवसांपासून अमिर बोट गोदीतच तळ ठोकून आहे. दरम्यानच्या काळात बोटीवरील 30 कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुटका करण्यात आली. मात्र, आता भारतातील तिघे कर्मचारी अडकले आहेत. यात ठाण्यातील किसननगर, भांडूप आणि कोल्हापुरातील तरुणाचा समावेश आहे. या तरुणांची बोटीतून सुटका करण्यासाठी इराणमधील भारतीय राजदूतांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. दरम्यान, किसननगरमधील तरुणांच्या पालकांची निरंजन डावखरे यांनी आज भेट घेतली. तसेच त्यांना दिलासा दिला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही पत्र पाठवून विवेक माळकर यांच्या कुटुंबीयांनी मदतीची विनंती केली आहे. उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त महिला आली होती 1500 लोकांच्या संपर्कात दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात हा आकडा 49वर पोहचला आहे. गुरुवारी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये काही करोनाग्रस्त रुग्ण अढळल्याने करोनाग्रस्तांचा आकडा अचानक वाढला. यात उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. आता या महिलेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये सापडलेली ही करोनाग्रस्त महिला काही दिवसांपूर्वीच शहरातील एका सत्संग कार्यक्रमाला उपस्थित होती, अशी माहिती पालिकेच्या तपासात समोर आली आहे. उल्हासनगरमधील या करोनाग्रस्त महिलेला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सध्या पालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. ही महिला दुबईहून काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांचीही चाचणी करण्यात आली आहे. तर, या महिलेच्या कुटुंबियांना वेगळे ठेवण्यात आले आहे. मात्र, आता या महिलेचा संपर्क 1500 लोकांशी आलेला असल्यामुळं सध्या उल्हासनगरमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित महिलेने 8 मार्च रोजी उल्हासनगरमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कोरोनाग्रस्त महिला 4 मार्च रोजी दुबईहून भारतात आली होती. त्यानंतर 8 मार्च रोजी तिने या संत्संगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर तब्येत खालवल्यमुळं तिची चाचणी करण्यात आली. या चाचणीत महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. मागील 15-20 दिवसांत या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सध्या पालिका घेत आहे. मात्र 1500 लोकांच्या संपर्कात ही महिला आल्यामुळे खळबळ माजली आहे. अद्याप पालिकेला या लोकांचा शोध घेता आला नाही आहे.
Published by:sachin Salve
First published: