• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Mumbai Unlock: मुंबईकरांना थोडा दिलासा! लोकल सुरू होणार पण...

Mumbai Unlock: मुंबईकरांना थोडा दिलासा! लोकल सुरू होणार पण...

पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याचं ठरवलं आहे. लोकल सेवा (Mumbai Local Train) सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळं मुंबईत लोकलसेवेबद्दल काय निर्णय होणार याकडं अनेकांचं लक्ष्य आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 जून : राज्यात दोन महिन्यांहून अधिक काळ लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’नंतर ‘अनलॉक’विषयी अनेक दिवसांपासून अनिश्चिततेचं वातावरण होतं. कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) हळूहळू आटोक्यात येत असल्याचं पाहून राज्य सरकारनं अनलॉक करण्याची पावलं उचलली आहेत. याचे काही निकष ठरवले असून पाच स्तर तयार केलेत. पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याचं ठरवलं आहे. लोकल सेवा (Mumbai Local Train) सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळं मुंबईत लोकलसेवेबद्दल काय निर्णय होणार हे एकदोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून गेल्या काही दिवसांपासून बराच गोंधळ सुरू होता. अखेर ‘अनलॉक’चे टप्पे काय असतील, यावर निर्णय घेण्यात आला असून यासाठी ठाकरे सरकारनं पंचस्तरीय सूत्र तयार केलं आहे. कोरोना संसर्गाच्या फैलावाच्या परिस्थितीनुसार याबबातची नियमावली आणि निकष तयार केले आहेत. राज्य स्तरावर वारंवार लॉकडाउन आणि अनलॉक करावा लागू नये, यासाठी ही पंचसूत्री तयार केल्याचं सरकारनं म्हटलंय. अनलॉक करण्यासाठी त्या-त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या आणि पॉझिटिव्ही रेट असे काही निकष ठेवले आहेत. पॉझिटिव्ही रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांतील किंवा शहरातील निर्बंध कायम ठेवण्यात येतील. तर, पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यांत काही ठिकाणीच निर्बंध ठेवले जातील. प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध बेडच्या संख्येनुसार स्थानिक प्रशासनाला याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. हे वाचा - PHOTOS: माळशेज घाटात दरड कोसळली; कारचा चक्काचूर, वाहतुकीवर परिणाम या आठवड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, त्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत म्हणजेच ४.४० टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध आणखी कमी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याबद्दलचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारनं महापालिकेला दिलेला असल्यानं मुंबई महापालिका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्याचंच लक्ष असणार आहे. हे वाचा - RED Alert: ठाणे आणि मुंबईकरांनो रविवारी घरातच थांबा; 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा गुरूवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ केला जाणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असेल आणि किती प्रमाणात निर्बंध हटवले जातील, यासाठीचे निकष निश्चित केल्याचंही वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झालाच नसल्याचं सरकारनं म्हटलं होतं. हा प्रस्ताव विचारधीन असल्याचं सांगत सरकारनं अनलॉकबद्दलची चर्चा थांबवली. पण, या सगळ्या उलट-सुलट विधानांनी झालेल्या गोंधळानंतर सरकारवर जोरदार टीका झाली. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले.
  Published by:News18 Desk
  First published: