• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • कोरोनामुळे मुंबईत क्रिकेटच्या सरावाला फूल स्टॉप; खेळाडूंनी व्यक्त केली निराशा

कोरोनामुळे मुंबईत क्रिकेटच्या सरावाला फूल स्टॉप; खेळाडूंनी व्यक्त केली निराशा

कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. तरुणांसमोर याचं मोठं आव्हाण आहे.

  • Share this:
मुंबई, 24 फेब्रुवारी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ओव्हल मैदान पुढील 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. इथे रोज मुंबई आणि मुंबईच्या इतर महापालिका क्षेत्रातून म्हणजेच विरार, वसई, मीरा रोड, भाईंदर, ठाणे या भागातून अनेक मुलं क्रिकेटच्या कोचिंगसाठी येत असतात. शुक्रवारी 26 फेब्रुवारीपासून हे खेळाचं मैदान पुढील 15 दिवस म्हणजेच मार्च महिन्यातील पाहिले 2 आठवडे खेळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील चर्चगेट भागांत मुंबई विद्यापीठाच्या समोर असणाऱ्या या मैदानात क्रिकेटचे साधारण 6 सामने होतील इतकं मोठं हे मैदान आहे. जिथे विविध वयोगटातील मुलांचं क्रिकेट कोचिंग होत. आणि विविध सामन्यासाठी ही मुलं निवडीसाठीही जात असतात. नालासोपाराहुन येणाऱ्या आदित्य वाघमारे याने लॉकडाऊनमुळे झालेली अवस्था व्यक्त केली. तो म्हणाला, मार्च 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत कुठेच खेळता आलं नाही ना कोणत्या सामन्यांमध्ये भाग घेता आलं. मागच्या 11 महिन्यात आज पहिल्यांदा मॅच खेळतोय त्यात ही बातमी ऐकून आता काय करू असं झालंय. आमच्याकडे तर इतके मोठे ग्राऊंड पण नाहीत, नाहीतर नालासोपाऱ्याहून इथे का आलो असतो?" तर चिंचपोकळीला राहणारा संदीप म्हणतो,' अंडर 19 साठी माझं सिलेक्शन जर आता झालं नाही तर? एप्रिलला मी 19 वर्षांचा होतोय. आणि सिलेक्शन होण्यासाठी मी चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे. पण मग ग्राउंड बंद झालं तर काय करणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे ही वाचा-महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी मोदी सरकारची धडपड; मदतीला केंद्रीय समिती या मुलांचा प्रश्न फक्त खेळण्यापूरता मर्यादित नाही तर त्यांचं संपूर्ण भविष्यच अवलंबून आहे. इथली गर्दी पाहता पालिकेचा निर्णय योग्य असला तरी त्याचा असा हा परिणाम मुलांना भोगावा लागेल.' आम्हाला मुलांच्या खेळण्याची जाणीव आहे. पण करणार काय? सातत्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. आणि इथे इतकी गर्दी होतेय, लांबून  मुलं इथं येतात. शनिवार रविवारी तर इथे पाऊल टाकायला जागा नसते. म्हणूनच पुढील 15 दिवसांकरिता हे मैदान खेळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे मैदान राज्यसरकारच्या अखत्यारीत येत असल्यानं त्यासंदर्भातील पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. " असं पालिकेच्या विभागातील सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव यांनी सांगितलं. ओव्हल मैदान हे  मुंबई शहरात असलेले एक मोठं मैदान आहे. एकूण 22 एकरात वसलेल्या या मैदानात एकाचवेळी 6 क्रिकेटचे सामने खेळले जातात. या मैदानात राजकीय रॅली आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: