Home /News /mumbai /

कोरोनाचे थैमान असतानाच आता राज्यावर घोंगावतय आणखी एक संकट

कोरोनाचे थैमान असतानाच आता राज्यावर घोंगावतय आणखी एक संकट

Maharashtra latest news: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आता कठोर निर्बंध सुद्धा लावण्यात आले आहेत.

    मुंबई, 9 जानेवारी : महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यासोबतच कोरनोाच्या ओमायक्रॉन (Omicron variant of Coronavirus) बाधितांची आकडेवारीही वाढत आहे. यामुळेच आता राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर पावलं उचलत काही निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. कोरोनाचं थैमान असतानाच आता राज्यावर आणखी एक संकट घोंगावत आहे आणि ते म्हणजे अवकाळी पावसाचं. राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. तर कुठे गारपीट होत आहे. त्यातच आता आणखी तीन दिवस राज्यातील काही भागहांड मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर काही भागांत गारा पडण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री कोकण, नाशिकमध्ये पाऊस ऐन थंडीचा मोसम सुरू असताना आज पहाटे रत्नागिरीत अचानक जोरदार पाऊस पडला. अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली असून आंबा आणि काजूच्या बागांना मोहोर येत असताना झालेला हा बदल बागायतींसाठी अनुकूल नसल्याचेही म्हटले जात आहे. मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इगतपुरीसह शहराच्या काही भागात पाऊस पडत आहे. ऐन थंडीत पाऊस आल्याने वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. यामुळे गार वारे आणि पावसाने थंडीत वाढ झाली आहे. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्याा चिंतेत भर पडली आहे. वाचा : राज्यात मुसळधार पावसासह पुन्हा होणार गारपीट; पुढील 5 दिवस अतिमहत्त्वाचे पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 9 जानेवारी कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 10 जानेवारी कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी णेगगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडण्याची शक्यता. वाचा : राज्यात नाईट कर्फ्यू, कडक निर्बंधही लागू, सरकारकडून नवी नियमावली जारी 11 जानेवारी कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व गारा पडण्याची शक्यता. 12 जानेवारी कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र - हवामान कोरडे राहण्याची शक्यता मराठवाडा - हवामान कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी णेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Corona, Maharashtra, Rain

    पुढील बातम्या