Home /News /mumbai /

टेंशन घेऊ नको रे, मित्रा! पॉझिटिव्ह पोलिसानेच दिला धीर; VIDEO पाहून तुम्ही कराल सलाम!

टेंशन घेऊ नको रे, मित्रा! पॉझिटिव्ह पोलिसानेच दिला धीर; VIDEO पाहून तुम्ही कराल सलाम!

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या लढवय्यांची जिद्द अजुनही कायम आहे हे मुंबई पोलीस दलातल्या एका तरुण जवानाने दाखवून दिलं आहे.

    मुंबई 29 एप्रिल: राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. देशात मुंबई हॉटस्पॉट ठरलं आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. या युद्धात सगळ्यात आघाडीवर आहेत ते डॉक्टर्स आणि पोलीस. डॉक्टर्स रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत आहेत. तर पोलीस लोकांचा जीव वाचावा यासाठी धडपडत आहेत. दिवस-रात्र त्याचं काम सुरू आहे. अशातच अनेक डॉक्टर्स आणि पोलिसांनाही कोरोनाने ग्रासलं आहे. मात्र या लढवय्यांची जिद्द अजुनही कायम आहे हे मुंबई पोलीस दलातल्या एका तरुण जवानाने दाखवून दिलं आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा एक VIDEO ट्वीट केला असून त्याचं धैर्य पाहून सगळ्यांनीच त्याला सलाम केला आहे. या जवानाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी अॅम्बुलन्समधून नेण्यात येत होतं. त्याला निरोप देण्यासाठी त्याचे सहकारी जमले होते. त्यावेळी सगळ्यांच्या चेहेऱ्यावर तणाव होता. मात्र धाडसी जवानच सगळ्यांना धीर देत होता. काही काळजी करू नका, टेंशन घेऊ नका, मी लवकरच पुन्हा ड्युटीवर परत येईन असं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. जवानाच्या या धाडसाचं सोशल मीडियावर सगळ्यांनी कौतुक केलं आहे. लोकांनी घरात राहावं म्हणून पोलीस प्रचंड मेहनत घेत आहेत. तरीही लोक विविध कारणं सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. लोकांनी सूचनांचं पालन केलं तर पोलिसांवरचा ताण नक्कीच कमी होणार आहे आणि अनेकांचा धोकाही टळणार आहे. हे वाचा - Lockdownच्या अर्थसंकटाचा कसा सामना करणार? राहुल यांनी घेतली रघुराम यांची मुलाखत राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 झाली आहे. राज्यात आज एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातले सर्वाधिक 26 मृत्यू मुंबईत झाले आहेत. म्हणजे जवळपास तासाला एक या दराने मुंबईत कोरोनाबळी जात आहेत. मुंबई महानगरपािलका क्षेत्रात आतापर्यंत एकूण 6644 रुग्ण झाले आहेत आणि आतापर्यंत 270 कोरोनामृत्यू नोंदले गेले आहेत. शहरात 24 तासांत 475 रुग्णांची वाढ झाली.  हे वाचा - लॉकडाऊनमुळे महिनाभर ब्युटी सर्व्हिस बंद; पाहा आपल्या या स्टार्सचा बिनमेकअपचा लुक आज राज्यात झालेल्या 32 करोना मृत्यूंपैकी मुंबईचे 26 सोडले तर पुणे शहरात 3, सोलापूर औरंगाबाद आणि पनवेल शहरात प्रत्येकी 1 मृत्यू नोंदला गेला आहे. आतापर्यंत 1593 रुग्णांना बरं करून घरी सोडण्यात आलं आहे. त्यापैकी 205 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Mumbai police

    पुढील बातम्या