Home /News /mumbai /

सावधान! राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3648, मुंबईला सर्वाधिक धोका

सावधान! राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3648, मुंबईला सर्वाधिक धोका

Mumbai: People at a market to buy essential items during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, at Dongri Market, in Mumbai, Thursday, March 26, 2020. (PTI Photo)(PTI26-03-2020_000265B)

Mumbai: People at a market to buy essential items during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, at Dongri Market, in Mumbai, Thursday, March 26, 2020. (PTI Photo)(PTI26-03-2020_000265B)

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या आकडेवारीत एकवाक्यता नाही. त्यामुळे मुंबई महापालिका आकडे लपविण्याचा प्रयत्न करतेय का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई 19 एप्रिल: राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात मुंबई आणि पुणे हे सर्वाधिक रुग्ण संख्येची शहरं बनत आहेत. राज्यात आज 328 रुग्ण वाढले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 3648वर गेली आहे. यात सगळ्यात जास्त मुंबईत 184 रुग्ण वाढले आहेत. तर पुण्यात 78 रुग्णांची भर पडलीय. मुंबईत आज 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 125वर गेली आहे. कोरोनासारख्या महत्त्वाच्या विषयावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या आकडेवारीत एकवाक्यता नाही. मुंबई महापालिका दिवसभरात 87 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं सांगत आहे तर राज्य सरकारने दिलेल्या माहितीत तो आकडा 184 एवढा आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आकडे लपविण्याचा प्रयत्न करतेय का? असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने 17 रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे अतिरीक्त 4355 खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषीत केलेल्या 30 रुग्णालयातील 2305 खाटा आणि आताच्या 4355 खाटा अशा राज्यात एकूण 6660 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुण्यातल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 646 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 520 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती पुण्याचे आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. हे वाचा -  चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक विभागात 646 बाधित रुग्ण असून 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 589 बाधीत रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 बाधीत रुग्ण असून कोल्हापूर  जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत. आजपर्यंत  विभागामध्ये एकूण 8 हजार 188 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 600 चा अहवाल मिळाला आहे. 588 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 909 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह तर 646चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

हे वाचा - COVID19: देशातल्या 22 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून नवा रुग्ण नाही, पहा यादी

आजपर्यंत विभागामधील 39 लाख 33 हजार 496 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 47 लाख 82 हजार 812  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 811 व्यक्तिंना अधिक तपासणीसाठी सांगण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या