धक्कादायक! विधिमंडळाच्या परिसरात निवांत फिरत होता कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी

धक्कादायक! विधिमंडळाच्या परिसरात निवांत फिरत होता कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी

या अधिकारीची चाचणी करण्यात आली होती. पण त्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला नव्हता.

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर : अखेर सहा महिन्यानंतर विधिमंडळाचे कामकाज सुरू झाले आहे. विधान भवनात पावसाळी अधिवेशनात कुणीही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण येऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. पण, संसदीय कार्य विभागाचा एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असताना विधिमंडळाच्या आवारात फिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोमवारपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन भरवण्यात आले आहे. विधान भवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. संसदीय कार्य विभागाचा एक अधिकारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मराठवाडा-विदर्भातील विद्यार्थ्यांना दिलासा, ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा

या अधिकारीची चाचणी करण्यात आली होती. पण त्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला नव्हता. असं असताना या अधिकाऱ्यानं स्वतःच्या हाताने पास वर निगेटिव्ह असल्याचा पेनाने मार्क केला आणि विधिमंडळ परिसरात आला.

पण नंतर या अधिकाऱ्याचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असल्याचं समोर आला. विशेष म्हणजे, हा अधिकारी गेल्या आठवड्यात आजारी असल्याचं त्याच्या कार्यालयातील सहकार्याने निदर्शनास आणून दिला. संबंधित अधिकाऱ्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्याने केलेला प्रकार गंभीर आहे. याची दखल घेतली, असून आजारपणातून बाहेर आला की, त्याच्यावर प्रशासकीय नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जालना पोलीस दल हादरले, मुख्यालयातच एसआयने गोळी झाडून केली आत्महत्या

विशेष म्हणजे, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या गेटवर आमदाराचा रिपोर्ट न आल्यामुळे गोंधळ उडाला होता. भाजपचे आमदार आणि माजी सभापती हरिभाऊ बागडे यांचा रिपोर्ट मिळाला नव्हता. त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिथे आले होते. त्यावेळी अजितदादांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.

Published by: sachin Salve
First published: September 8, 2020, 12:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या