मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दिलासादायक आकडे! दिल्लीबरोबर मुंबईतही Coronavirus तिसरी लाट लवकरच ओसरणार? Peak येऊन गेल्याचा दावा

दिलासादायक आकडे! दिल्लीबरोबर मुंबईतही Coronavirus तिसरी लाट लवकरच ओसरणार? Peak येऊन गेल्याचा दावा

कोरोना रुग्णांची संख्या बरीच वरती जाऊन म्हणजेच Peak ला जाऊन अचानकपणे खाली येईल असा दावा तज्ज्ञांनी केला होता. तो आता कुठेतरी खरा होताना दिसतो आहे.

मुंबई, 15 जानेवारी: राज्यात आणि मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह (Corona 3rd wave) ओमायक्रॉनचा प्रभाव (Omicron patients in Maharashtra) बघायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांमधील कोरोनाची आकडेवारी (Today corona patients in Mumbai) अक्षरशः घाबरावणारी आहे. मुंबईच नाही तर दिल्लीतही (Corona in Delhi) रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण आहे. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांतील आकडेवारी बघितली तर कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात ओसरताना (Fall of corona cases in Mumbai) बघायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या (Corona patients in Mumbai today) कमी होताना दिसत आहे. राज्यात आजही कोरोना रुग्णांची संख्या बरीच कमी झालेली दिसून येतेय.

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही मुख्य शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपूर्वी 40 ते 50 हजारांच्या घरात पोहोचली होती. त्यामुळे आता परत लॉकडाउन (Lockdown in Mumbai) लागणार की काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र आता अचानकपणे हे आकडे कमी होऊ लागले आहेत. मुंबई आणि दिल्लीत कोरोना (have peak corona arrived in Mumbai) रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे बराच दिलासा मिळाला आहे.

पुण्यात दिवसभरात तब्बल 5 हजार 705 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 8 मृत्यूची नोंद

भारतात तिसरी लाट जरी आली असली तरी साऊथ आफ्रिकेप्रमाणेच कोरोना रुग्णांची संख्या बरीच वरती जाऊन म्हणजेच Peak ला जाऊन अचानकपणे खाली येईल असा दावा तज्ज्ञांनी केला होता. तो आता कुठेतरी खरा होताना दिसतो आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे 20 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर मृत्यूचं प्रमाणही कमी झालेलं बघायला मिळत आहे.

शुक्रवारी मुंबईत 11,317 नवीनकोरोना रुग्ण आढळून आले होते मात्र दिलासादायक बाब म्हणजे ही संख्या गुरुवारपेक्षा तब्बल 17 टक्क्यांनी कमी होती. तसंच मुंबईतील टोटल पॉझीटीव्हीटी रेटही कमी झालेला बघायला मिळालं होता. तर कोरोनावर 22 हजार 73 रुग्णांनी मात केली होती त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही कोरोनाबाधितांच्या दुप्पट होती.

मुंबईत आज काय स्थिती

शनिवारी म्हणजे आज दिवसभरात मुंबईत (corona patients in Mumbai today) तब्बल 10,661 कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा मृत्यू (deaths in Mumbai corona) झाला आहे. कालच्या तुलनेत कोरून रुग्णांच्या तुलनेत 656 रुग्णांची घट झाली आहे. तर मृत्युसंख्येत 2 रूग्णांची वाढ झाली आहे. मात्र कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या ही दिलासादायक बाब आहे.

'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच', अखेर अजित पवारांनी शब्द मागे घेतला

मुंबईत लसीकरणावर भर

"बीएमसीने आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण केलं आहे. त्यापैकी 90 लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णालय आणि ऑक्सिजनचा वापर वाढेपर्यंत निर्बंध लादले जाणार नाहीत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत चहल म्हणाले की, गेल्या 16 दिवसांत 19 मृत्यू झाले आहेत, परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. मुंबईत सध्या एक लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत पण रोज फक्त 10 टन ऑक्सिजन वापरला जात आहे", अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC commissioner Iqbal Singh Chahal) यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona patient, Delhi, Mumbai