• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • राज्यात कोरोनाचा उद्रेक! पुन्हा लॉकडाऊन करणार? अखेर आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

राज्यात कोरोनाचा उद्रेक! पुन्हा लॉकडाऊन करणार? अखेर आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Maharashtra Corona Update : गेल्या 24 तासात वर्षभरातील सर्वात मोठी रुग्णसंख्या समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे

  • Share this:
    मुंबई, 15 मार्च : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले. (Corona outbreak in the state) यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.  संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. हे ही वाचा- Jalgaon :महामृत्यूंजय मंत्राच्या जपामुळे कोरोनातून सुटका; योग शिक्षकाचा अजब दावा राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 24 तासात 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. या वर्षांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
    Published by:Meenal Gangurde
    First published: