• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • राजधानी मुंबईत कोरोनाचा महाविस्फोट, शहरात आढळली रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या!

राजधानी मुंबईत कोरोनाचा महाविस्फोट, शहरात आढळली रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या!

पुण्यात 31 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात 8 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत.

पुण्यात 31 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात 8 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत.

मुंबईत कोरोनाचा महाविस्फोट (Corona Patients in Mumbai) झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:
मुंबई, 27 मार्च : राजधानी मुंबईत कोरोनाचा महाविस्फोट (Corona Patients in Mumbai) झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आज मुंबई शहरात तब्बल 6 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवशी शहरात आढळलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मुंबईत 6 हजार 123 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांनी कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावला आहे. मुंबई शहरात सध्याच्या स्थितीत 41 हजार 609 सक्रिय रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक होत असल्याने रुग्ण बरे होण्याचा दरही कमी झाला असून हा दर आता 86 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. या आकडेवारीमुळे आता मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लवकरच कडक निर्बंध लादले जाऊ शकतात. हेही वाचा - होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यातील जनतेला खास आवाहन मुंबईत गंभीर स्थिती, निर्माण झाले नवे हॉटस्पॉट मुंबई शहरात दर आठवड्याला कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट समोर येत आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी पण कमी होत आहे. त्याचबरोबर दर आठवड्याला रुग्ण वाढीचा दरही अनेक प्रभागात जवळपास तीन पटीने वाढलेला आहे. सध्या बांद्रा पश्चिम सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे आणि त्या खालोखाल चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, गोरेगाव आणि बांद्रा पूर्व असे अनेक हॉटस्पॉट बघायला मिळतात. एका आठवड्यात जवळपास बाराशे ते पंधराशे रुग्ण अनेक प्रभागात वाढले आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विना मास्क सार्वजनिकरित्या फिरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत एकूण 46 कोटी 87 लाख 57 हजार इतका दंड वसूल करण्यात आला यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत रुपये 42कोटी 16 लाख 36 हजार 400 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी 4 कोटी 35 लाख 78 हजार 800 रुपये दंड वसुली केली आहे. उपनगरीय रेल्वेमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्यांकडून आतापर्यंत 35 लाख 41 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.
Published by:Akshay Shitole
First published: