मुंबई, 7 मार्च : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या काही कमी होताना दिसत नाही. राज्यात आज तर कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. राज्यभरात आज तब्बल 11 हजार 141 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही वाढती रुग्णसंख्या शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
राज्यात आज 38 करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मतृयदूर 2.36 टक्के एवढा आहे. दुसरीकडे, राज्यात आज 6 हजार 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.17 टक्के एवढे आहे.
विदर्भात कोरोनाचा धुमाकूळ, अमरावतीत काय आहे स्थिती?
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्यात आज सकाळपासून तब्बल 446 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 39524 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबादमध्ये प्रशासनाकडून कठोर निर्णय
औरंगाबादच्या (Aurangabad) जिल्हाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे. '15 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण लॉक डाऊन करण्यापेक्षा अंशतः लॉक डाऊन लावण्यात येणार आहे. 11 मार्च रोजी रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. त्यानंतरही कोरोना रुग्ण वाढले तर कडक लॉकडाऊन लावण्यात येईल,' अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.