राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढणार? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढणार? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Maharashtra Lockdown updates: आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल: महाराष्ट्रात लागू असलेला लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) 15 मे नंतर पुन्हा वाढवणार की अटींमध्ये शिथिलता आणणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. याचे उत्तर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी (Cabinet meeting)नंतर समोर येईल. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून राज्यातील लॉकडाऊन संदर्भात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील कोरोनाचा आलेख घसरतोय

राज्यात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन नंतर कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या आकडेवारीला ब्रेक लागला. कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात लागू असलेला लॉकडाऊन हा पुन्हा वाढवणार की नियमांमध्ये शिथिलता येणार यावर मंत्रिमंडळात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

वाचा: Mucormycosis चे कल्याण-डोंबिवलीत दोन बळी; सहा रुग्णांवर उपचार सुरू

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाकडून अनेक जिल्ह्यांत कठोर लॉकडाऊन जाहीर केला आहे. काही जिल्ह्यांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तीन वेळा निर्बंध वाढवले

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यानंतर पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता 15 मे नंतर राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Published by: Sunil Desale
First published: May 12, 2021, 12:33 AM IST

ताज्या बातम्या