मुंबई, 29 सप्टेंबर : वसईत पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी तिल्हेर गावात आलेले राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on BJP) यांच्या भाषणावेळी अचानक वीज गेली. यावेळी पटोले यांनी चक्क मेगा फोन घेत खांद्याला लटकवून पुढचे भाषण सुरू ठेवले. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका (Nana Patole Criticize BJP) केली. कोरोना (Corona Virus in India) हा आजार मानवनिर्मित असून तो भारतात आणला गेला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
त्याचसोबत कोरोना काळात अमित शहा यांच्या मुलाचा नफा नऊ हजार पट वाढला होता, त्यासाठी अमित शहा यांच्याकडे कोणती जादूची कांडी आहे का? असा प्रश्न करत ती कांडी देशातील बेरोजगार तरुणांना द्यावी, ज्याचा देशातील बेरोजगारांनाही फायदा होईल असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला गॅस योजनेवरही त्यांनी जोरदार टीका करत महिलांनी मतदान करण्यासाठी जाताना घरातील गॅस बघून जावा असे वक्तव्य त्यांनी केले. देशाच्या तरुणाईला संपविण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
हे ही वाचा-मोठी बातमी, प्रभाग पद्धतीच्या निर्णयावर ठाकरे सरकार ठाम, बदल नाहीच!
कोरोनावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात असताना एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी सध्या कमी झाली आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्राचाही आकडाही दिलासादायक आहे. राज्यातील नव्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. पण त्याचवेळी मृत्यूदर मात्र वाढताना दिसतो आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा जास्त आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर हा 31 मे, 2021 रोजी 0.37 होता जो 27 सप्टेंबर, 2021 ला 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ रुग्णवाढ लक्षणीयरित्या कमी झाली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही 97.26 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Nana Patole, काँग्रेस