• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • काळजी घ्या! पुणे, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये घरीच कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढले

काळजी घ्या! पुणे, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये घरीच कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढले

'लोकं कोरोना चाचणी करत नाही किंवा उशिरा करतायत, त्यामुळे तब्येत खालावल्यानंतरच ते रुग्णालयात येतात'

  • Share this:
मुंबई, 16 एप्रिल : अनेकदा ताप (Fever), सर्दी (cold) आहे म्हणून कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जोपर्यंत कोरोना झाला आहे हे कळतं तोपर्यंत अनेकदा वेळ निघून जाते आणि थेट मृत्यूच गाठतो. अशा घरीच कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) या तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने घरीच करोनाबाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. सध्या महाराष्ट्रात 6 लाख 12 हजार 70 इतके सक्रिय रुग्ण आहेत. पण असे अनेकजण असू शकतात, ज्यांनी आपली कोरोनाची चाचणीच केली नाही किंवा जे आपल्याला आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहेत. कोविड 19च्या टास्क फोर्स मधील डॉ तात्याराव लहाने यांच्या मते, 'लोकं कोविड 19 ची चाचणी करीत नाहीत. आता 20 ते 50 अशा कमावत्या वर्गाला कोरोना होतोय. लोक कोरोना चाचणी करत नाही किंवा उशिरा करतायत, त्यामुळे तब्येत खालावल्यानंतरच ते रुग्णालयात येतात.' अकोला हादरलं, आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलीस स्टेशनमध्ये केले विष प्राशन लोकांच्या निष्काळजीपणापद्द्ल बोलताना डॉ लहाने म्हणतात की, 'हे पडसं, खोकला नाहीये. हा कोविड आहे. एकदा वाढल्यानंतर यावर उपाय नाही. ताप कणकण आली तरी कोविड टेस्ट करा. कोविडचे रुग्णालयात brought डेड आणण्याची संख्या वाढली आहे. किंवा रुग्णालयात आणल्यानंतर 24 तासांत मृत्यू होतोय. क्रोसीन घेऊन अंगावर काढू नका. हे धोकादायक आहे. मुंबईत कोरोनाने घरीच मृत होण्याची सध्या तरी घटना नाही. पण नागपूर, औरंगाबाद आणि पुण्यात मात्र हे घडतंय. कोरोनामुळे आतापर्यंत औरंगाबादेत 1511 मृत्यू ओढवले आहे तर पुण्यात 8636, नागपूरात 4385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील मृत्यूला कारणीभूत अनेक घटक आहेत. पण उशिरा निदान होणं हे ही महत्वाचे कारण असल्याने अनेकदा रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या रुग्ण दगावतोय. राज्यासाठी आनंदाची बातमी, हाफकिन संस्थेला लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी डॉ लहाने यांच्या मते' राज्यात कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणारे आरटीपीसीआर किट पुरेशा प्रमाणात असून लोकं सरकारी रुग्णालयात का जात नाहीत. खाजगी लॅब त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक नमुने घेतात आणि रिपोर्ट द्यायला वेळ लावत आहेत. अशात बाधित इतर अनेकांना पण नकळत बाधित करत आहेत. सरकारी रुग्णालयात आम्ही 24 तासांत चाचणीचे रिपोर्ट देतोय आणि आता तसेच आदेश आम्ही खाजगी लॅब ना पण देत आहोत की त्यांनीही करोना चाचणीचे नमुने घेतल्यानंतर 24 तासांच्या आत रिपोर्ट द्यावा.' बदलापुरात राहणारा 32 वर्षांचा तरुण आदित्य ( नाव बदललेले) हा सुरवातीला सर्दी आहे म्हणून कोरोना चाचणी न करता साध्या पॅरासिटीमोल गोळ्या घेऊन घरीच थांबला, पण लक्षण वाढली आणि त्याने आरटीपीसीआर चाचणी केली तेव्हा तो बाधित असल्याचं निष्पन्न झालं. पण तोपर्यंत महत्वाचे 5 दिवस निघून गेले आणि आदित्य आता 6 रेमेडीसीवीरचे इंजेक्शन दिल्यानंतरही आता व्हेंटिलेटरवर गेला आहे. त्यामुळे वेळेत करोना निदान होणं गरजेचं आहे.
Published by:sachin Salve
First published: