राज्यात कोरोना मृत्यूमध्ये 60 टक्के लोक 61वर्षांच्या वरचे, डायबेटीस, ब्लडप्रेशर असलेल्यांना जास्त धोका

राज्यात कोरोना मृत्यूमध्ये 60 टक्के लोक 61वर्षांच्या वरचे, डायबेटीस, ब्लडप्रेशर असलेल्यांना जास्त धोका

60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ज्यांना डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर असे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज

  • Share this:

मुंबई 06 एप्रिल : राज्यात आज कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्या 868  झाली आहे. आतापर्यत  70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज दिवसभरात राज्यात 7 जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. हे सगळे रुग्ण मुंबई आणि परिसरात दाखल होते. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या 52 झाली आहे. या सगळ्या रुग्णांच्या अभ्यासावरून तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत.

एकूण मृत्यूमध्ये पुरुषांचं प्रमाण हे 73 टक्के आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 60 टक्के लोक हे 61 वर्षांच्या वरचे आहेत. 45 वर्षाखालील एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 78 टक्के लोकांना डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर यासारखे गंभीर आजार होते. त्यामुळे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ज्यांना डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर असे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

70 जण झाले बरे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17,563 नमुन्यांपैकी 15,808 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 70 जण बरे झाले आहेत.

कोरोनामुळे उद्धव ठाकरे CMOमध्येही घेताहेत अतिदक्षता, तयार केला नवा प्लान

सध्या राज्यात 32,521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3498  जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये म्हणजे रुग्णालय किंवा सरकारी संस्थांमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर  शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 8 जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे.

क्लस्टर कंटेन्मेंट

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

 

First published: April 6, 2020, 10:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading