Home /News /mumbai /

शिंदे सरकार येताच मविआने सुरू केलेल्या चाईल्ड टास्क फोर्सने गाशा गुंडाळला!

शिंदे सरकार येताच मविआने सुरू केलेल्या चाईल्ड टास्क फोर्सने गाशा गुंडाळला!

 
चाईल्ड टास्क फोर्सची गरज नव्या सरकारला आहे की नाही हे न कळल्यानं राजीनामा देत असल्याचे डॉ. सुहास प्रभु यांनी स्पष्ट केलं

चाईल्ड टास्क फोर्सची गरज नव्या सरकारला आहे की नाही हे न कळल्यानं राजीनामा देत असल्याचे डॉ. सुहास प्रभु यांनी स्पष्ट केलं

चाईल्ड टास्क फोर्सची गरज नव्या सरकारला आहे की नाही हे न कळल्यानं राजीनामा देत असल्याचे डॉ. सुहास प्रभु यांनी स्पष्ट केलं

    मुंबई, 06 जुलै : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी कामाचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. अशातच शिंदे सरकार येताच मविआ सरकारच्या काळातील कोविड नियंत्रणाच्या विशेष यंत्रणांनी आपले काम गुंडाळले आहे.चाईल्ड टास्क फोर्सचे (Child Task Force)  प्रमुख डॉ. सुहास प्रभु यांनी राजीनामा (Dr. Suhas Prabhu resigned) दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनावर मात करण्यासाठी मोठी मोहिम राबवली होती. वेगवेगळ्या टीम स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थितीत आटोक्यात आणण्यात मविआ सरकारला यश आले आहे. मविआ सरकारच्या काळातील कोविड नियंत्रणाच्या विशेष यंत्रणांनी आपले काम गुंडाळले आहे. चाईल्ड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. सुहास प्रभु यांनी  राजीनामा दिला आहे.  ठाकरे सरकारच्या काळात तयार झालेल्या विशेष बाल कोविड टास्क फोर्सचे काम बंद करण्यात आले आहे. चाईल्ड टास्क फोर्सची गरज नव्या सरकारला आहे की नाही हे न कळल्यानं राजीनामा देत असल्याचे डॉ. सुहास प्रभु यांनी स्पष्ट केलं. तसंच, गरज असल्यास नवे सरकार चाईल्ड टास्क फोर्स सुरु करू शकेल मात्र, नव्या सरकारकडून कोणताही संवाद अद्याप झाला नसल्याचेही डॉ.प्रभु यांचं म्हणणं आहे. (शिंदे गटाचा मोठा नेता राज ठाकरेंच्या भेटीला, बालेकिल्ल्यात शिवसेनेला देणार शह?) दोनच दिवसांपूर्वी, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धारावीचे कोविड-19 संकट हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादर येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळा येथे बदली करण्यात आली आहे. दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे सध्या पश्चिम उपनगरातील के/पूर्व (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत. दरम्यान, सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळा प्रभागाचे प्रभारी मनीष वलंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (VIDEO : मुंबईसह उपनगरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज) दिघावकर यांनी जी/उत्तर (जी/एन) वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी दादर, माहीम आणि धारावी परिसराचा तीन वर्षे समावेश केला आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे अशी ओळख आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या