• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Big News : राज्यातील तुरुंगांमध्ये कोरोनाचा स्फोट, धक्कादायक आकडेवारी समोर!

Big News : राज्यातील तुरुंगांमध्ये कोरोनाचा स्फोट, धक्कादायक आकडेवारी समोर!

महाराष्ट्रात तुरुंगांमध्ये क्षमतेच्या दुप्पट कैदी आहेत. राज्यातील 47 तुरुंगाची क्षमता 23,217 आहे. पण सद्या याठिकाणी एकूण 34,422 कैदी आहेत.

  • Share this:
मुंबई, 20 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचं संकट समोर उभं ठाकलेलं असतानाच आता सरकारसमोर आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. ते म्हणजे राज्यातील तुरुंगांमध्ये असलेल्या रुग्णांना होणारा कोरोना संसर्ग. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा स्फोट (Corona blasts in state prisons) झाल्याचं पाहायला मिळत आहे. कैद्यांबरोबरच तुरुंगातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. (300 positive including prisoners and staff) राज्यातल्या विविध कारागृहांमध्ये सध्या कोरोनाग्रस्त कैद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसंच तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होतेय. सध्या कोरोनाची लागण असलेल्या विविध तुरुंगांतील कैद्यांची एकूण संख्या 197 आहे तर 94 तुरुंग कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा विळखा बसलाय. तुरुंगातील मृतांचा आकडा 15 असून यात 7 कैद्यांचा आणि 8 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण आकडेवारी पाहता आतापर्यंत 3172 कैदी आणि 744 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोणत्या कारागृहात किती रुग्ण? येरवडा कारागृह पुणे - 50 36 कैदी - 14 कर्मचारी कल्याण आधारवाडी कारागृह - 32 31 कैदी - 1 कर्मचारी कोल्हापूर कारागृह - 28 सर्व कैदी मुंबईत आर्थर रोड जेल - 6 2 कैदी - 4 कर्मचारी ठाणे कारागृह - 24 21 कैदी - 3 कर्मचारी तळोजा कारागृह 3 कर्मचारी गर्दी कमी करावी निवृत्त पोलीस अधिकारी पी. के जैन यांच्या मते, 'महाराष्ट्रातील कारागृहात अनेक असे कैदी आहेत ज्यांना जातमुचलक्याकर सोडलं तर कारागृहातील गर्दी कमी होऊ शकते. तसंच आरोप आहेत पण प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गुन्हे सिद्ध झालेले नाही, असेही अनेक कैदी आहेत. त्यांनाही जामीन दिला तर संभाव्य संसर्ग रोखता येऊ शकतो.' क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी 'महाराष्ट्रात तुरुंगांमध्ये क्षमतेच्या दुप्पट कैदी आहेत. राज्यातील 47 तुरुंगाची क्षमता 23,217 आहे. पण सद्या याठिकाणी एकूण 34,422 कैदी आहेत. त्यापैकी बहुतांश कैदी खटला सुरू असलेले आहेत. काहींनी त्यांची शिक्षादेखील पूर्ण केलीय. त्यामुळं याठिकाणची गर्दी कमी करणं शक्य आहे. तसं झाल्यास कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोखता येऊ शकतं.' तुरुंगांची सध्यस्थिती आर्थर रोड तुरुंग क्षमता : 804 - असलेले कैदी : 2834 ठाणे कारागृह क्षमता : 1105 - असलेले कैदी : 3758 तळोजा कारागृह क्षमता : 2124 - असलेले कैदी : 3353 येरवडा कारागृह क्षमता : 2449 - असलेले कैदी : 6170 कोर्टाने घेतली दखल कोर्टानं याची गंभीर दखल घेत याचिका दाखल करून घेतली. त्याच्या सुनावणीत खंडपीठानं कैदी नव्हे तर तुरुंगातील कर्मचारीच कारागृहात संसर्ग नेतात, असं नमूद केलं. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून कोर्टानं येरवडा, कोल्हापूर आणि इतर तुरुंगांत गर्दी असल्याचं म्हटलं. राज्याने तुरुंगांची कोंडी फोडण्याचा विचार केला पाहिजे. त्यावर राज्य सरकरकडून कैद्यांना लवकरच पॅरोल आणि जामीनावर सोडणार असल्याचं कळवण्यात आलं. नकोसा आकडा : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनावरील लसीचे 4800 हून अधिक डोस गेले वाया गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू लागला त्यावेळीही तुरुंगांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अनेक खटल्यांतील कैद्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. आता नवीन कोरोना स्ट्रेन झपाट्यानं पसरत असल्याने सरकारनं या दृष्टीनं  लवकरच पावलं उचलणं गरजेचं आहे.
Published by:sachin Salve
First published: