मुंबईत COVID-19 रुग्णांची सेवा करणाऱ्या 144 नर्सेसना 3 महिन्यांपासून पगारच नाही

मुंबईत COVID-19 रुग्णांची सेवा करणाऱ्या 144 नर्सेसना 3 महिन्यांपासून पगारच नाही

कोरोनासारख्या गंभीर आजाराशी आपला जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आणि रुग्णांंची सेवा देणाऱ्या या योध्यांना तातडीने वेतन देण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.

  • Share this:

मुंबई 26 जुलै: राज्यात आणि देशातही मुंबई हा कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट (Mumbai Corona Hotspot) झाला आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी मुंबई महापालीकेने (Mumbai municipal corporation) मे महिन्यामध्ये 144 नर्सेसची भरती केली होती. नंतर महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये त्या रुजूही झाल्या. आता तीन महिन्यानंतरही त्यांना पगारच मिळालेला नाही. एवढच नाही तर त्यांच्या नियुक्त्या कशा प्रकारे करायच्या याचाही घोळच सुरु आहे. ‘Mumbai Mirror’ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने मे महिन्यात या 144 नर्सेसची भरती केली. गेल्या तीन महिन्यांपासून त्या कोविड रुग्णांच्या वॉर्ड्समध्ये सेवा देत आहेत. मात्र वेतनच मिळत नसल्याने शेवटी त्यांनी शुक्रवारी पालिकेच्या कार्यालयात जाऊन निवेदनही दिलं. या सर्व नर्सेस या 26 ते 28 या वयोगटातल्या आहेत.

या सगळ्या नसर्सेचची सोय पालिकेने हॉटेल्स आणि इतर ठिकाणी केली आहे. यातल्या दोघी जणी या प्रेग्नंट असल्याचंही या वृत्तात म्हटलेलं आहे. जोखमीचं काम करत असतानाही किती दिवस घरून पैसे मागवायचे असा सवाल या नर्सेसनी केला आहे.

जलसावरील कंटेनमेंट झोन पोस्टर हटलं; आता बिग बींची इच्छा पूर्ण होण्याची प्रतीक्षा

प्रविण परदेशी हे आयुक्त असतांना या सगळ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यानंतर नवे आयुक्त आले आणि या सगळ्या नसर्सेच्या नियुक्तिचा आणि वेतनाचा पेच निर्माण झाला. या सगळ्यांची नियुक्ती ही कायमस्वरुपी करायची की कॉन्ट्रॅक्ट करायचा हा प्रश्नही अजुन सुटलेला नाही.

त्यामुळे यांचं वेतन नेमकं कसं करायचं हे अजुन निश्चित झालेलं नाही. या नर्सेसना दररोजचा मिळणारा 300 रुपयांचा भत्ताही त्यांना मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2018मध्ये पालिकेने दिलेल्या जाहीरातीमध्ये नर्सेसना महिन्याला 52 हजार एवढं वेतन देण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तेवढं वेतन मिळावं अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

माझ्याजवळ कुणीच येत नाही; कोरोनावर उपचार घेत असलेल्या बिग बींनी शेअर केला अनुभव

कोरोनासारख्या गंभीर आजाराशी आपला जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आणि रुग्णांंची सेवा देणाऱ्या या योध्यांना तातडीने वेतन देण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 26, 2020, 8:17 PM IST

ताज्या बातम्या