Home /News /mumbai /

महाविकास आघाडीत वादाची चिन्ह? काँग्रेसचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल!

महाविकास आघाडीत वादाची चिन्ह? काँग्रेसचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल!

भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. याच वादातून आता...

मुंबई, 23 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi government) स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील निवडणुकीत सुद्धा तिन्ही पक्ष एकत्र आले होते. परंतु, भिवंडीमध्ये काँग्रेसला (Congress) धक्का बसला आहे. काँग्रेसमधील 18 नगरसेवक हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये नगरसेवकांचा प्रवेश सोहळा पार पडला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे  यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी दौंड येथील रासपच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यात मोठी चोरी, 38 लाखांचं साहित्य लंपास तर भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. याच वादातून आता काँग्रेसचे 18 नगरसेवक हे  काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. या सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने नोटीस दिली होती. त्यानंतर आता या नगरसेवकांनी काँग्रेसलाच हात दाखवला आहे. एल्गार परिषदेवरून पुण्यात वाद पेटला! ब्राह्मण महासंघानं केली 'ही' मागणी विशेष म्हणजे, शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये म्हणून सुरुवातीला नकार दिला होता. परंतु, त्यानंतर आता या सर्व नगरसेवकांनी एकाकी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. काय आहे प्रकरण? भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीच्या प्रतिभा विकास पाटील यांनी बाजी मारली होती. विशेष म्हणजे, कोणार्क विकास आघाडीचे 4 नगरसवेक, रिपाई ऐक्यचे 4, समाजवादी 2 आणि  1 अपक्ष अशा 11 नगसेवकांची मोट बांधून  महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी मैदानात उतरली होती. फेसबुकवर जुळलं प्रेम; लग्नाच्या 3 वर्षांनंतर तरुणाचा धक्कादायक प्रताप आला समोर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी  46 नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे कोणार्क आघाडीचा विलास आर.पाटील यांच्या सौदेबाजीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडून कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी ठरल्या त्यांना 49 मते मिळावी. तर काँगेसच्या उमेदवार रिषिका राका यांना 41 मते मिळाली. मात्र काँग्रेसची एक हाती सत्ता असून काँग्रेसला8 मतांनी पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची सुमारे 18 मते फुटल्याने सौदागर विलास पाटील भिवंडी पालिकेत बाजीगर ठरले होते. खान्देशात भाजपला खिंडार, विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर! सत्ताधरी काँग्रेस पक्षाकडे 47 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेकडे 12 नगरसवेक आहेत. महापालिकेत काँग्रेस - शिवसेनेच्या आघाडीची सत्ता आहे.  मात्र, काँग्रेसच्या 21 नगरसेवकांचा एक गट आणि  विरोधी पक्ष गटातील भाजपचे 20 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख तथा माजी महापौर विलास आर.पाटील यांच्या गोटात दाखल झाल्याने काँग्रेसला फटका बसला होता. एवढंच नाहीतर  उपमहापौरपदी काँग्रेसचे फुटीर गटाचे इम्रानवली मोहमंद यांना ही 49 मतं मिळावून शिवसेनेचे बाळाराम चौधरी यांचा 8 मतांनी पराभव केला. यामुळे काँग्रेस - शिवसेनेची सत्ता महापालिकेतून गेल्याने दोन्ही पक्षाला मोठा धक्का बसला होता.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Congress, NCP, काँग्रेस, नगरसेवक, राष्ट्रवादी

पुढील बातम्या