मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर सेना आक्रमक होताच, भाजपची सपशेल माघार!

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर सेना आक्रमक होताच, भाजपची सपशेल माघार!

भाजप शिष्टमंडळाने पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली. 'महापौर मुंबईच्या प्रथम नागरिक आहे.  त्यांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे'

भाजप शिष्टमंडळाने पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली. 'महापौर मुंबईच्या प्रथम नागरिक आहे. त्यांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे'

भाजप शिष्टमंडळाने पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली. 'महापौर मुंबईच्या प्रथम नागरिक आहे. त्यांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 07 डिसेंबर : मुंबईतील वरळीमध्ये (worli blast case) झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून भाजप (bjp) आणि शिवसेनेमध्ये (shivsena) आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला. आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांसह पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर भाजपनेही सपशेल माघार घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (vishwas nangare patil) यांची भेट घेतली. महापौरांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे, असं म्हणत कारवाईची मागणी केली.

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात सेना महिला आघाडी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.  आशिष शेलार यांनी महापौर यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं होत याच्याविरोधात तक्रार केली जाणार आहे.  कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नागरे पाटील (vishwas nangare patil) यांच्याकडे तक्रार करणार आहे.  आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे.  नगरसेविका विशाखा राऊत, मीनाताई कांबळे यांच्यासह मुंबईतील सर्व महिला विभाग प्रमुखांनी तसे पत्र दिले आहे.

भूत बंगल्यात शिरताच तरुणाचा मृत्यू, काय खरं नी काय खोटं? रंगली चर्चा

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली होती.  एका महिलेची फसवणूक झाली होती त्या प्रकरणात ही भेट मागितली होती. त्यामुळे आज विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली आहे. आशिष शेलार हे संवेदनशील आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे, त्यांनी असे शब्द वापरला पाहिजे नव्हता. ते काय बोलले हे मी ऐकलं नाही पण तुमच्या माध्यमातून कळलं, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

तर दुसरीकडे भाजप शिष्टमंडळाने पोलीस सह आयुक्त नागरे पाटील यांची भेट घेतली.  महापौर मुंबईच्या प्रथम नागरिक आहे.  त्यांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे.  अपमानपर समाजमाध्यमांवर आणि ट्विट करणाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

बॅन लिपस्टिक व्हिडिओ मागील सत्य अखेर आलं समोर, अनुराधाशी कनेक्शन

तसंच, आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून , व्हिडिओ तोडून मोडून समाजमाध्यमांवर टाकला जात असल्याच भाजपचं म्हणणं आहे. काही लोक जाणूनबुजून महापौरांचा अपमान अश्या पद्धतीने करतायत. त्यामुळे अश्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिते प्रमाणे योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करावा, असे लेखी निवेदन भाजप नगरसेविकांनी पोलीस सह आयुक्तांकडे केली आहे.

First published:

Tags: Ashish shelar