भाजप नेत्याचं वादग्रस्त कार्टुन, शिवसेनाचा वाघ बिथरणार!

भाजप नेत्याचं वादग्रस्त कार्टुन, शिवसेनाचा वाघ बिथरणार!

हे कार्टुन शिवसेनेला झोंबण्याची चिन्हे असून वाघ भाजपविरुद्ध पुन्हा डरकाळी फोडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 1 नोव्हेंबर : महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा वाद चिघळलाय. निकाल लागून आता 7 दिवस होत आहेत. भाजप-शिवसेनेला जनतेनं निर्भेळ बहुमत दिलंय. मात्र सत्तेतल्या वाटणीवरून वाद सुरू असल्याने अजुनही सत्ता स्थापन होऊ शकलं नाही. दोन्ही पक्षाचे नेते आरोप-प्रत्यारोप करत असल्याने हा वाद आता देशभर चर्चेचा विषय ठरलाय. दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी एक कार्टुन पोस्ट केलं असून या कार्टुनमुळे शिवसेनेचा वाघ बिथरण्याची शक्यता आहे. बग्गा यांनी ट्विट केलेल्या कार्टुनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात एक रिंग आहे आणि वाघ रागाने त्यांच्याकडे बघतोय. आखीर तुम्हे आणा है, जरा देर लगेगी असं वाक्य त्यावर लिहिण्यात आलंय.

जहरी टीका करणाऱ्या संजय राऊतांवर भाजपचा पहिला पलटवार

शिवसेनेने कितीही आढे-ओढे घेतले तरी त्याला भाजपकडे यावच लागेल असंच सूचित करण्यात आलंय. हे कार्टुन शिवसेनेला झोंबण्याची चिन्हे असून वाघ भाजपविरुद्ध पुन्हा डरकाळी फोडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदासह सर्व गोष्टी समसमान पद्धतीने वाटून घेऊ असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर मुख्यमंत्रिपद कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला द्यायचं नाही यावर भाजप ठाम आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि काही महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी आहे असंही सूत्रांनी सांगितलंय. जास्तीत जास्त आपल्या पदारात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष दबावाचं राजकारण करताहेत.

प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, 'या' पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळण्याचा अंदाज

'लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे'

'लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे' असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरही संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

शिवसेनेसोबत सत्तासंघर्ष सुरू असतानाच अमित शहांनी भाजप नेत्यांना पाठवला संदेश

काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे त्याच नियमांनुसार आताही जागेची वाटणी व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले. तर तसं नाही झालं तर आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू असंही राऊतांनी स्पष्ट केलं. स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल आणि महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 1, 2019, 2:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading