Home /News /mumbai /

'ठाकरे सरकार'चा पहिला मंत्री अडचणीत, उदय सामंत यांच्या डिग्रीवरून वाद

'ठाकरे सरकार'चा पहिला मंत्री अडचणीत, उदय सामंत यांच्या डिग्रीवरून वाद

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही दिवस जात नाहीत तोवरच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे अडचणीत सापडले आहेत.

    मुंबई, 7 जानेवारी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही दिवस जात नाहीत तोवरच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे अडचणीत सापडले आहेत. कारण सामंत यांच्या डिग्रीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. उदय सामंत यांनी ज्या विद्यापीठातून इंजिनिअरींगची डिग्री घेतली होती, त्या विद्यापीठाला सरकारची मान्यता नसल्याचा आरोप करत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरदास यांनी सावंत यांची डिग्री बोगस असल्याचं म्हटलं आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाइल इंजिनअरींगचा डिप्लोमा केला असल्याचं उदय सामंत यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. मात्र या ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासनाची मान्यता नसल्याचा आरोप याआधीही करण्यात आला होता. त्यामुळे उदय सामंत वादात सापडले आहेत. वादावर काय म्हणाले उदय सामंत? बोगस डिग्रीचा आरोप झाल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'वैयक्तिक ज्ञानात भर टाकण्यासाठीच मी ही डिग्री घेतली होती. मात्र मी त्या डिग्रीद्वारे आजपर्यंत कोणताही सरकारी लाभ अथवा नोकरी मिळवलेली नाही,' असं सामंत यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे माझे बॉस नाहीत - अशोक चव्हाण विनोद तावडेही 'ज्ञानेश्वर'चे विद्यार्थी, झाला होता वाद बोगस पदवी प्रकरणावरून मागील सरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे अडचणीत आले होते. विनोद तावडे यांचीही इंजिनिअरींगची पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठाची आहे. आणि या विद्यापीठाला शासन मान्यता नाही. त्यामुळे तावडेंची पदवी बोगस आहे, असा आरोप तेव्हाचे विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला. पदवीशिवाय तावडे फक्त 12 वी पास आहेत. काँग्रेसने तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसंच त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी तेव्हा केली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, दिल्लीचे माजी मंत्री जितेंद्रसिंह तोमर, राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कथित बोगस पदवीप्रकरणाने याआधी वाद झाला असताना आता उदय सामंत यांचं नावही या प्रकरणात आलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Shivsena, Uday samant, Uddhav thackeray

    पुढील बातम्या