नवी मुंबई महापालिकेच्या कामांकडे ठेकेदारांनी फिरवली पाठ

नवी मुंबई महापालिकेच्या कामांकडे ठेकेदारांनी फिरवली पाठ

संच महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी अंदाज पत्रकीय दरपेक्षाही कमी दराने निविदा असायला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे ठेकेदारांनी पालिकेची कामे न घेण्याचा निर्णय घेतलाय.

  • Share this:

नवी मुंबई, 19 सप्टेंबर: महापालिकेच्या कामांकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. यामुळे नवी मुंबईच्या विकासावर परिणाम होतो आहे.

माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात ठेकेदारावर सरसकट साडेसात टक्के दंड आकारला गेला होता.तसंच दिड वर्षांपासून कामाची बिलेही रोखून धरली गेली होती. तसंच महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी अंदाज पत्रकीय दरपेक्षाही कमी दराने निविदा असायला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे ठेकेदारांनी पालिकेची कामे न घेण्याचा निर्णय घेतलाय. ठेकेदारांच्या या भूमिकेमुळे 212 कामांची 4 वेळा फेरनिविदा काढण्यात आली. पण ठेकेदार कामाच्या निविदा भरत नाही आहेत.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महापालिकेची ठेव ही 1500 कोटींवर असून देखील विकासकामे रखडल्याने नागरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 12:17 PM IST

ताज्या बातम्या