IBNलोकमतचा दणका : शालेय पोषण आहारातली ठेकेदारी होणार बंद

सुमारे साडेतीनशे कोटीच्या धान्यखरेदीत ठेकेदार मलिदा खात असल्याचं समोर आलं होतं. या बातमीची शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तातडीने दखल घेत यापुढे शालेय पोषण आहार पुरवठ्याचा निधी शालेय व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2017 05:16 PM IST

IBNलोकमतचा दणका : शालेय पोषण आहारातली ठेकेदारी होणार बंद

09 जुलै : शालेय पोषण आहार योजनेत चढ्या भावाने धान्य खरेदी होत असल्याचं आयबीएन लोकमतनं समोर आणलं होतं. सुमारे साडेतीनशे कोटीच्या धान्यखरेदीत ठेकेदार मलिदा खात असल्याचं समोर आलं होतं. या बातमीची शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तातडीने दखल घेत यापुढे शालेय पोषण आहार पुरवठ्याचा निधी शालेय व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय.

ठेकेदारी व्यवस्था बंद करुन तो निधी थेट शाळांना देता येईल का याविषयी कार्यवाही करत असल्याचं तावडे यांनी सांगितलंय.

प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. 33 जिल्हयातील 82 हजार शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. यासाठी दरवर्षी साडे तीनशे कोटींचं धान्य खरेदी केलं जातं. मात्र ही खेरदी करताना आपल्याला दरवर्षी तेच ठेकेदार येताना दिसत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...