राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे सहकार्य चांगले, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे सहकार्य चांगले, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

'सोनिया गांधी यांच्याशी बऱ्याच वेळा फोनवर बोलणे होत असते. त्या नेहमी विचारता "सरकारचे चांगले काम सुरू आहे, आमची लोकं त्रास तर देत नाही ना"

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) वर्षपूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने तिन्ही पक्षांचे प्रमुख आज एकाच व्यासपीठावर आले. यावेळी 'राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे नेते जास्त सहकार्य करता, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना चिमटा काढला.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही.' पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुफाना फटकेबाजी पाहण्यास मिळाली.

'सोनिया गांधी यांच्याशी एकदाच भेट झाली. बऱ्याच वेळा त्यांच्याशी फोनवर बोलणे होत असते. त्या नेहमी विचारता "सरकारचे चांगले काम सुरू आहे, आमची लोकं त्रास तर देत नाही ना", असं त्या खरंच विचारत असता. पण, मी तुमची बाजू त्यांच्याकडे लावून धरत असतो. निदान राष्ट्रवादीपेक्षा जास्त सहकार्य हे तुम्ही  करता' असं उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली.

'मैदानातून येऊन टोलेबाजी करण्याचा वेगळा अनुभव आहे.  गेल्या वर्षभरामध्ये आमचं टीमवर्क झाले ते पाहता हे सर्व माझे सहकारी आहे. शासनातले आहे, प्रशासनातले आहे.  शरद पवार यांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहे. अजूनही विश्वास बसत नाही. एक वर्ष पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष क्रिकेट पाहणे आणि मैदानात उतरून टोलेबाजी करणे हे वेगळं असतं. त्यासाठी टीम ही मजबूत असायला लागते. माझी टीम ही उत्तम आहे. सर्व जण अनुभवी आहे. सर्व जण छान काम करत आहे' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्व सहकार्यांचं कौतुक केलं.

'अनेक जणांना असं वाटत होते की, हे सरकार होऊच शकणार नाही. आपल्या मागे फरफटत येणारच. पण शिवसेना कधी फरफटत जाणाऱ्या पक्षासारखी नव्हती, आधी नव्हती आणि आताही नसणार आहे' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'या सरकारमध्ये कुठे उगाच अडेलतटूपणा नाही, सर्वांची मानमर्यादा धरून काम पाहिले जात आहे. विषय उगाच लावून धरले जात नाही. 3 चाकी सरकार म्हणतात. पण चौथ चाकं म्हणजे लोकांचा विश्वास आहे, आमचे पाय जमिनीवर घट्ट आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी  फडणवीस यांना टोला लगावला.

'माझा माझ्या सहकार्यांवर पूर्णविश्वास आहे. त्यामुळे मी काही फोन टॅपिंग वैगेर भानगडीत पडत नाही. गृहमंत्री हे अनिल देशमुखच आहे. आपल्या सरकारमध्ये पारदर्शक कारभार चालला आहे' असंही उद्धव ठाकरेंनी म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 6:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या