Home /News /mumbai /

क्रॉस वोटिंग आणि फ्लोर टेस्टला गैरहजर आमदारांची खैर नाही; संतप्त काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

क्रॉस वोटिंग आणि फ्लोर टेस्टला गैरहजर आमदारांची खैर नाही; संतप्त काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीला काँग्रेसचे अनेक आमदार सभागृहात उपस्थित नव्हते (Congress MLAs absent for Floor test). याशिवाय विधानपरिषद निवडणुकीतही सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting MLC) केलं होतं.

    मुंबई 07 जुलै : राज्यात शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. परिणामी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिवसेनेचे अनेक खासदार आणि नगरसेवकही एकनाथ शिंदे यांना समर्थन देत पुढे आले. मात्र, फक्त शिवसेनाच नाही तर आता काँग्रेसमध्येही धुसफूस सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीला काँग्रेसचे अनेक आमदार सभागृहात उपस्थित नव्हते (Congress MLAs absent for Floor test). याशिवाय विधानपरिषद निवडणुकीतही सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting MLC) केलं होतं. शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले यानंतर आता काँग्रेस हायकमांडने याबाबत कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र एमएलसी निवडणुकीत क्रॉस व्होटिंग आणि फ्लोर टेस्ट दरम्यान काही काँग्रेस आमदारांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस हायकमांड संतप्त आहे. याबाबत सीएलपीकडून अहवाल मागवला गेला आहे. आमदारांच्या या कृत्यामुळे हायकमांडकडून या आमदारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसची काही मतं फुटल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर भाजपच्या उमेदवारांनी 10 पैकी पाच जागा जिंकल्या होत्या. तर, राष्ट्रवादी-शिवसेनेचे 2-2 उमेदवार विजयी झाले होते आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला होता. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळीही काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. आपल्याला सभागृहात येण्यास उशीर झाला असल्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं. या बहुमत चाचणीमध्ये शिंदे सरकारला 164 इतकं बहुमत मिळालं होतं. तर, महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: अशोक चव्हाणCongress

    पुढील बातम्या