मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, 'या' नेत्याची होऊ शकते निवड?

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, 'या' नेत्याची होऊ शकते निवड?

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार की राष्ट्रवादीकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार की राष्ट्रवादीकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार की राष्ट्रवादीकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे

मुंबई, 05 फेब्रुवारी :  काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदी कुणाची निवड होणार या चर्चांना ऊत आला आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार की राष्ट्रवादीकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु, विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार अशी माहिती समोर आली आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून अनेक नावं चर्चेत आली आहे. (Sangram Thopte), सुरेश वारपूडकर (Suresh Varpurdkar) आणि अमीन पटेल (Amin Patel) यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. त्याच बरोबर आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी (kc padavi) यांचे सुद्धा नाव शर्यतीत आघाडीवर आहे, असे वृत्त टीव्ही 9 वृत्तवाहिनीने दिले आहे.

हात लावताच गुदगुदल्या होणारं झाड; स्पर्श करताच हलू लागतात फांद्या

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना समसमान वाटप कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे कोणतेही बदल यामध्ये होणार नाही. केसी पाडवी हे आदिवासी विकास मंत्री असून विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड होऊ शकते. पाडवी हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. केसी पाडवी हे अक्कलकुव्या मतदारसंघातील आमदार आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदही भूषवलेली आहे.

त्याचबरोबर नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत.

तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून  निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Congress