महाआघाडीत जुंपली, शिवसेनेच्या मंत्र्याने अशोक चव्हाणांना फटकारले

महाआघाडीत जुंपली, शिवसेनेच्या मंत्र्याने अशोक चव्हाणांना फटकारले

'सरकार हे राज्यघटनेने सांगितलेल्या तत्वांप्रमाणेच काम करत असते त्यामुळे काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही.'

  • Share this:

मुंबई 27 जानेवारी : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाला आता वेग येतोय. मात्र असं होत असतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांनी वेग वेगळ्या चर्चेंना तोंड फुटतंय. माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं बोलताना शिवसेनेला थेट इशाराच दिलाय. शिवसेनेसोबत सरकारमध्ये येताना काँग्रेस हायकमांडने आम्हाला अतिशय कडक आदेश दिले होते. घटनाबाह्य काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घ्या असं आम्हाला बजावण्यात आलं होतं आणि आम्ही ते उद्धव ठाकरेंना सांगितलं अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली होती.

मात्र अशोक चव्हाणांचं म्हणणं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावलंय. शिवसेनेनं काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितलं की, सरकार हे राज्यघटनेने सांगितलेल्या तत्वांप्रमाणेच काम करत असते त्यामुळे काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही. अशोक चव्हाण यांनी कुठल्या संदर्भात हे विधान केलं ते माहित नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला बसणार धक्का, दिल्लीत मोदींचाच झेंडा

काय म्हणाले अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण म्हणाले, तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचं सरकार आलं तर भांडणं होतं असं सोनिया गांधी यांना वाटत होतं. त्यामुळे सत्तेत सहभागी होऊ नये असं त्यांचं मत होतं.

शिवसेना घटनाबाह्य काम करेल अशी भीतीही त्यांना वाटत होती. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना ते स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनीही घटनाबाह्य काम होणार नाही याचं आश्वासन दिलं अशी माहितीही त्यांनी दिली.

आता रात्रीही करा Enjoy, मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरू

ते पुढे म्हणाले, शिवसेनेने कुठलंही घटनाबाह्य काम केलं तर काँग्रेस सत्तेत राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. ज्या दिवशी सरकार आलं त्याच दिवशी हे ठरलंय असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2020 02:47 PM IST

ताज्या बातम्या