मुख्यमंत्र्याविरोधातील काँग्रेसची 'पोलखोल यात्रा' लांबणीवर, हे आहे कारण..

मुख्यमंत्र्याविरोधातील काँग्रेसची 'पोलखोल यात्रा' लांबणीवर, हे आहे कारण..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधातील काँग्रेसची 'पोलखोल यात्रा' लांबणीवर पडली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, (प्रतिनिधी)

मुंबई, 18 ऑगस्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधातील काँग्रेसची 'पोलखोल यात्रा' लांबणीवर पडली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळे ही यात्रा पुढे ढकलण्यात आले. पोलखोल यात्रा 20 ऐवजी 25 ऑगस्टला सुरु होणार आहे. काँग्रेसची पोलखोल यात्रा मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून नाना पटोले ही यात्रा काढणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातले 'फेव्हरेट' नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. नाना पटोले यांनी महाजनादेश यात्रेवरून मुख्यमंत्र्यांसह भाजपचा समाचार घेतला होता. महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोले विदर्भात 'फडवणीस पोलखोल' यात्रा काढणार आहेत. विदर्भात जिथे मुख्यमंत्री गेले तिथे जाऊन फडवणीस सरकारने जनतेची कशाप्रकारे फसवणूक केली, सांगणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच...

कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत नाना पटोले यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर खोचक टीका केली होती. दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच, अशा शब्दात टोला लगावला होता. मुख्यमंत्री जसा वागतो, तसेच मंत्रिमंडळातील मंत्री वागतात. सेफ बोटमध्ये मंत्री फिरतात, असा ही आरोपा नाना पटोले यांनी केला होता. एका बाजूला राज्यात अस्मानी आणि दुष्काळी संकट तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा करीत आहेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले होते.

...म्हणून नाना पटोले फेव्हरेट

नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच कडवी टीका करून भाजपची साथ सोडली होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका करत नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, मोदी सरकारला शेतकऱ्यांची किंमत नाही', अशी जाहीर टीका करत नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली होती. मोदी सरकारच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळातील पहिलं बंड मानलं गेलं.

SPECIAL REPORT : राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये भगवा पॅटर्न, काँग्रेसला करणार हद्दपार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 01:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading