मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'PM Cares मधून कॉर्पोरेट कंपन्यांना दिलं जातंय दान', काँग्रेस नेत्याचा धक्कादायक आरोप

'PM Cares मधून कॉर्पोरेट कंपन्यांना दिलं जातंय दान', काँग्रेस नेत्याचा धक्कादायक आरोप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आरोप केला आहे की, पीएम केअर्स निधीतून (PM Cares Fund)उपलब्ध करून देण्यात आलेले सर्व व्हेंटिलेटर (Ventilator)निकृष्ट असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद (Aurangabad) द्वारे नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं सांगितलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 मे : देशभरात सध्या कोरोनाच्या (Corona)दुसऱ्या लाटेचा (Second Wave)प्रकोप पाहायला मिळत आहे. त्याचवेळी राजकीय पक्षदेखिल एकमेकांवर आरोप प्रत्यारोपामध्ये व्यस्त आहेत. महाराष्ट्र कांग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत पीएम केअर्स निधीतून (PM Cares Fund)उपलब्ध करून देण्यात आलेले सर्व व्हेंटिलेटर (Ventilator)निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद (Aurangabad) द्वारे नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं तसा अहवाल दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं पीएम केअर्स फंडातील निधीचा हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी कमिटीच्या अहवालाबाबत ट्विट करताना म्हटले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी एक समिती नेमली होती. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला पीएम केअर्स (PMCaresFund) अंतर्गत पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर पूर्णतः निरुपयोगी आढळले. त्यांच्या अहवालानुसार कंपनीचे तंत्रज्ञदेखील हे व्हेंटिलेटर दुरुस्त करू शकले नाहीत. त्यामुळं या सर्व प्रकरणामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

या प्रकारानंतर केंद्रामार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. पीएम केअर्सच्या माध्यमातून वाया गेलेला वेळ आणि जनतेचा पैसा अक्षम्य आहे. मोदी सरकारने देशातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यासाठी भाग पाडले. या फंडा बाबत माहिती ही दिली नाही किंवा माहितीचा अधिकार लागू केला नाही. पण आता अशा अत्यंत तकलादू व फालतू कंपन्यांना हे कंत्राट कसे आणि का मिळाले हे जनतेला समजलेच पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.  मानवतेकरिता या सर्वात मोठ्या संकटात घोटाळा सोडा पण नफेखोरीचा होऊ देण्याचा विचार करणेही अमानुष आहे, असल्याचंही ते म्हणाले.

यापूर्वीही काँग्रेसने आरोप केला होता की, कोरोनासाठी परदेशातून मिळणाऱ्या मदतीतून महाराष्ट्राला वाटा देण्यात भेदभाव केला जात आहे. सचिन सावंत यांनी आरोप केला होता की, 40 देशांमधून मदतीसाठी साहित्य भारताला मिळालं. पण त्याचं वाटप करताना महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आलं. केंद्र सरकार हे साहित्य भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना मोठ्या प्रमाणावर वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. एकूणच या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये जनतेला मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं ठरतंय.

First published:

Tags: Congress