कोणत्या पोलीस स्टेशनला येऊ? भाजप नेत्यानं काँग्रेसला दिलं ओपन चॅलेंज

'काँग्रेस प्रवक्ते आणि गृहमंत्र्यांची हिंमत असेल तर गुन्हे दाखल करा.'

  • Share this:

मुंबई, 11 जानेवारी : 'किरीट सोमय्या यांच्यासह आरएसएस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करायला हवा,' अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्यावर आता भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही जोरदार उत्तर दिलं आहे.

काँग्रेस प्रवक्ते आणि गृहमंत्र्यांची हिंमत असेल तर गुन्हे दाखल करा, कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायचे हे सांगावं, असं आव्हानच भाजपच्या किरीट सोमया यांनी दिलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थेच्या नमत्से सदा वत्सेले या प्रार्थनेत हिंदू राष्ट्राचा उल्लेख आहे, जो पूर्णपणे असंविधानिक आहे, असा आक्षेप घेत सचिन सावंत यांनी कारवाईची मागणी केली होती. त्याला किरीट सोमय्या यांनीही आक्रमक शब्दांत उत्तर दिलं. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजप आमने-सामने येणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, भाजपकडून पुढे करण्यात येणाऱ्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून याआधीही काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वाद झाला आहे. अलिकडच्या काही दिवसांत तर स्वातंत्र्यवीर सावरकर हेदेखील या दोन्ही पक्षांत वादाचं कारण ठरताना पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2020 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading