मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'..नड्डा जी, मोदी जी ने देश बना दिया मौत का अड्डा जी', शायरीच्या माध्यमातून सचिन सावंतांचा पंतप्रधानांवर हल्ला

'..नड्डा जी, मोदी जी ने देश बना दिया मौत का अड्डा जी', शायरीच्या माध्यमातून सचिन सावंतांचा पंतप्रधानांवर हल्ला

sachin sawant on PM Modi शायरीच्या माध्यमातून किंवा लघु कवितेच्या माध्यमातून त्यांनी हे आरोप करतानाच देशाला सरकारनं किती संकटात टाकलं असं वर्णन करत जे.पी.नड्डा यांना चिमटे काढले आहे.

sachin sawant on PM Modi शायरीच्या माध्यमातून किंवा लघु कवितेच्या माध्यमातून त्यांनी हे आरोप करतानाच देशाला सरकारनं किती संकटात टाकलं असं वर्णन करत जे.पी.नड्डा यांना चिमटे काढले आहे.

sachin sawant on PM Modi शायरीच्या माध्यमातून किंवा लघु कवितेच्या माध्यमातून त्यांनी हे आरोप करतानाच देशाला सरकारनं किती संकटात टाकलं असं वर्णन करत जे.पी.नड्डा यांना चिमटे काढले आहे.

मुंबई, 11 मे : देशात पसरत चाललेला कोरोना (Coronavirus) हे मोठं संकट असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणाचंही (Politics) संकट अधिक मोठं होत चाललं आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपवर (BJP) काँग्रेसनं कोरोनावरून जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी राष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सगळे सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. अशाच एका काँग्रेसे नेत्याची (Congress Leader) टीका चर्चेत आहे. सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी त्यांच्या ट्विटरवर एका शायरीद्वारे किंवा लघुकवितेद्वारे भाजपवर टीका केलीय.

(वाचा-ईडीकडून कारवायाऐवजी देशातील ऑक्सिजनच्या स्थितीकडे लक्ष द्या,रोहित पवारांचा टोला)

सचिन सावंत हे अत्यंक आक्रमकपणे काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकार किंवा पंतप्रधान आणि भाजपवर ते हल्ला चढवत असतात. भाजप नेत्यांनाही ते अगदी सडेतोडपणे उत्तरं देत असतात. सचिन सावंत यांच्या अशाच एका ट्विटची सध्या चर्चा आहे. सावंत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शायरीच्या माध्यमातून किंवा लघु कवितेच्या माध्यमातून त्यांनी हे आरोप करतानाच देशाला सरकारनं किती संकटात टाकलं असं वर्णन करत जे.पी.नड्डा यांना चिमटे काढले आहे.

(वाचा-Maratha Reservation: लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार - मुख्यमंत्री)

असा आहे सार..

सचिन सावंत यांनी त्यांच्या कवितेच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. पण सोनियांनी पत्र लिहिण्याआधीच मोदीजींनी देशाला खड्ड्यात ढकलल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. जो देश विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर होता, त्याला भिकारी बनवल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणुकीमध्ये प्रशासनाला व्यस्त करत देशाला मृत्यूचा अड्डा बनवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. असे अत्यंत गंभीर आरोप करताना त्यांनी वापरलेली शैली मात्र काहीशी गमतीशीर असल्याचं पाहायला मिळालं.

सचिन सावंत यांनी अनिल देशमुख प्रकरणावरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने सुरू केलेला हा राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनताही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं देशावरील कोरोनाच्या संकटात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असताना राजकीय पक्षांमधली ही तूतू-मैमै या लढाईला कमकुवत तर करणार नाही, असा संशय सामान्यांच्या मनात आहे.

First published:

Tags: Congress, Coronavirus, PM Naredra Modi