काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांची राहत्या घरात आत्महत्या

काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांची राहत्या घरात आत्महत्या

महादेव शेलार हे पेशाने वकिल होते. काँग्रेसमध्ये एक कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ता असा त्यांचा प्रवास होता.

  • Share this:

14 आॅक्टोबर :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये. शेलार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलीये.

महादेव शेलार हे मुलुंडच्या एलबीएस रोडवरील बिलवा कुंजमध्ये राहत होते. त्यांनी आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तात्काळ मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी महादेव शेलार यांचा मृतदेह नेण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

महादेव शेलार हे पेशाने वकिल होते. काँग्रेसमध्ये एक कार्यकर्ता ते  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ता असा त्यांचा प्रवास होता.

First published: October 14, 2017, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading