योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका भाजपकडून अशाही परिस्थितीत राजकारण केले जात आहे. राजकारण बंद करा. राजकारण करण्याची ही वेळ नाही. आताच्या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून मदतीसाठी पुढे आलं पाहिजे. युपीमध्ये आमच्या हजारो बसेस थांबवण्यात आल्या होत्या. जर तुम्हाला तुमच्या पक्षाचे स्टिकर लावायचे असेल तर खुशाला लावा, पण गाड्या अडवू नका, अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर केली. 'भारत माता रडतेय आणि तुम्ही मौन धारण केलंय' 'या देशातील लोकांनी आपल्याला साथ दिली. त्यामुळे आपण सत्तेत येऊ शकलो, या जनतेनं विजयात तुमचा जयजयकार केला आहे. आज देशातील जनता त्रस्त आहे. एक मुलगा आपल्या आई-वडिलांना हजारो किलोमीटर पायी घेऊन जात आहे. कुठे एखादी मुलगी शेकडो किलोमीटर आपल्या वडिलांना सायकलीवर घेऊन जात आहे. श्रमिक रेल्वेत मजुरांचा मृत्यू होत आहेत. देशातली एक-एक आई रडत आहे. आपली भारत माता रडत आहे आणि तुम्ही मौन धारण करून बसला आहात. तुम्ही काहीच बोलत नाही आणि समोरही मदतीसाठी येत नाही' अशी टीका प्रियांकांनी पंतप्रधान मोदींवर केली. तसंच, 'आम्ही काही राजकीय मागणी करत नाही. आम्ही माणुसकीच्या नात्यातून तुम्हाला आग्रह करतोय की, या जनतेनं तुम्हाला मोठं केलं आहे. त्यामुळे या संकटकाळात तुम्ही सर्वांची मदत करावी' असं आवाहनही त्यांनी मोदींना केलं आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक गरजू लोकांच्या खात्यात 10 हजार रुपये टाकण्यात यावे. आणि प्रत्येक महिन्याला 7,500 रुपये देण्यात यावे. जे छोटे व्यापारी आहे. त्यांच्यासाठी एक विशेष पॅकेज जाहीर करावे, ज्यामुळे त्याच्यावर कोणताही कर्जाचा बोजा पडणार नाही, अशी मागणीही प्रियांका गांधींनी केली. संपादन - सचिन साळवेहम सबका कर्तव्य है कि हम साथ मिलकर जरुरतमंदों की मदद के लिए आवाज उठाएं। मैं आवाज उठा रही हूं, आप भी उठाएं। #SpeakUpIndia https://t.co/sL9Bi7mhuC
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narendra modi