'काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकते?'

भाजप शिवसेनेचे केवळ सत्तेसाठी तात्पुरते वाद, नंतर पुन्हा एकत्र येणार. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेसने पडू नये असा सल्ला संजय निरुपम यांनी दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 11:20 AM IST

'काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकते?'

मुंबई, 01 नोव्हेंबर : राज्यांत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना आता काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी मात्र, वेगळी भूमिका घेत एक ट्वीट केलं आहे. निरूपम यांनी सेना-भाजपा ड्रामा तात्पुरता आहे. काँग्रेस शिवसेनेच्या  पाठीशी कसे राहतील ? असा सवाल करत त्यांनी हे टीव्ट केलं आहे. खरंतर याआधीही काँग्रेस आणि शिवसेना सोबत येणार नसल्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांकडून मांडण्यात आली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही याविरोधात ट्वीट केलं आहे.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ हे दिल्लीत आज सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह शिष्टमंडळ हे आज सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आदी नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.त्यानुसार आता संजय निरुपम यांच्या ट्वीटमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

संजय निरुपम यांनी यांनी ट्वीट करत काँग्रेस नेत्यांना सल्ला दिला आहे. भाजप शिवसेनेचे केवळ सत्तेसाठी तात्पुरते वाद, नंतर पुन्हा एकत्र येणार. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेसने पडू नये असा सल्ला संजय निरुपम यांनी दिला आहे. सत्तेत आल्यानंतर ते परत एकत्र येतील आणि आम्हाला शिव्या घालतील असंही संजय राऊत यांनी ट्वीटमधून म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

'लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'; राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपला धडकी

'लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे' असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरही संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे त्याच नियमांनुसार आताही जागेची वाटणी व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले. तर तसं नाही झालं तर आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू असंही राऊतांनी स्पष्ट केलं. स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल आणि महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

पवारांच्या भेटीवर राऊतांचा खुलासा

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पवारांच्या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी निवडणुकांमध्ये त्यांची ताकद दाखवली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, महायुतीची चर्चा आधीच झाली आहे. त्यामुळे सत्तेत समान वाटप झालं पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे. पण तसं झालं नाही तर शिवसेनेनं  मनात आणलं तर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्थिर सरकार आणण्यासाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल. तर ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी सरकार स्थापन करण्याची डेरिंग करू नये असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. भाजप देईल ती ऑफर स्वीकराण्यासाठी आम्ही दुकान टाकून बसलो नाही. आम्ही काही व्यापरी नाही आहोत असंही संजय राऊत म्हणाले.

राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांकडून मोठा खुलासा

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. अशातच 'आम्हीही बहुमताचा आकडा गाठू शकतो. आता लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,' अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून माझं बोलणं झालेलं नाही. फक्त आम्ही 3 महिन्यांपूर्वी संसदेत बोललो होतो. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या कोणाशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही,' असं CNN News18 सोबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...