S M L

समविचारी पक्षांनी एकत्र यावं, काँग्रेस महाआघाडीसाठी सज्ज

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2018 07:04 PM IST

समविचारी पक्षांनी एकत्र यावं, काँग्रेस महाआघाडीसाठी सज्ज

मुंबई, ९ जून : आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसण्यास सुरुवात केली असून समविचारी पक्षांना एकत्र घेण्याचं धोरणच काँग्रेसने आखलं आहे.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी याबद्दल सुचोवात केलाय.

आज गांधीभवन इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशेसंदर्भात चर्चा करण्यात आली. जवळपास पाच तास चाललेल्या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरिता मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.

धर्मांध आणि जातीयवादी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांनी एकत्र यावे. कर्नाटकप्रमाणे समविचारी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल. सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधात महाआघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्ष पुढाकार घेईल असं  अशोक चव्हाण म्हणाले.तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी १२ जून रोजी मुंबईत येणार आहेत. या बैठकीचा अहवाल त्यांना सादर करून यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे एस.टी. कर्मचा-यांचा संप चिघळला आहे. संपकरी कर्मचारी आणि संघटनांशी चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी सरकारने एस. टी. कर्मचा-यांवर कारवाई करून दडपशाही सुरू केली आहे अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2018 07:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close