Home /News /mumbai /

सोनिया गांधींचं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही, संजय राऊतांनी केला खुलासा

सोनिया गांधींचं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही, संजय राऊतांनी केला खुलासा

राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवण्यात सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे.

    मुंबई, 19 डिसेंबर: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) या UPA च्या अध्यक्ष आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवण्यात सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही, असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) केला आहे. सोनिया गांधीच्या पत्राचं स्वागत व्हावं. किमान समान कार्यक्रम महत्वाचा आहे. सरकारची गाडी रुळावर आली असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा...शिवसेनेनं गमावला परळ ब्रँड वाघ... माजी खासदार मोहन रावले यांचं निधन खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनामुळे मधल्या काळात किमान समान कार्यक्रमातील काही कामे मागे राहिली. सरकारी यंत्रणा कोरोनाच्या लढाईत व्यग्र असल्यामुळे कामे राहिल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली आहे. महाविकास आघाडीत दबावाचं राजकारण नसल्याचं राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र पालटलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे भिन्न विचारसणीचे पक्ष एकत्रित आले आहे. सोनिया गांधींनी काय लिहिलं आहे पत्रात... सरकार स्थापन करताना दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचे ठरविले होते. आता त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी मांडली आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या थेट पत्रातून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. अनुसूचित जाती /जमातींसाठी योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सोनिया गांधी यांनी पत्रात उल्लेख केला आहे. राज्यातील सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी कमी केला गेला आहे. त्यावरूनच सोनिया गांधी यांनी भूमिका घेत आदिवासी आणि दलित समाजासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही भूमिका मांडली आहे. मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दलित आणि आदिवासी यांच्यासंदर्भातील योजनांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची होती. त्याचा संदर्भ देत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. हेही वाचा.....अन् 25 लाखांचा निधी मिळवा, शिवसेना आमदारानं केलं आवाहन भाजप आमदाराची काँग्रेस नेत्यांना सल्ला... दुसरीकडे, भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकादा सडकून टीका केली आहे. हे महाविकास आघाडीचं सरकार दलीत, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे. हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र, आता सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे. आतातरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठी लाचारी नाकारून आपल्या समाज बांधवांसाठी न्याय मिळवून द्यावा, असा सल्ला आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या