मुंबई 27 जुलै: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण या सगळ्या शुभेच्छा होत्या फोनवरून. दरवर्षी या दिवशी ‘मातोश्री’वर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी असते. हार तुरे, पुष्प गुच्छ, मिठाई यांनी मातोश्री भरून जाते. मात्र यावर्षीचा वाढदिवस अनेक अर्थाने वेगळा ठरला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच फोन करून शुभेच्छा दिल्या आणि उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छाही व्यक्त केल्यात.
शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केल्याने महाराष्ट्रातलं राजकीय गणितच बदलून गेलं आहे. भाजप आणि शिवसेना हे 25 वर्षांपासूनचे मित्र राजकीय विरोधक झालेत. तर जन्मापासून ज्यांचा विरोध शिवसेनेने केला ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्र झालेत. त्यामुळे शुभेच्छांमध्येही बदल झालाय. दरवर्षी भाजपचे सगळेच दिग्गज नेते शुभेच्छांमध्ये अग्रेसर होते. यावर्षीही त्यांनी शुभेच्छा दिल्या मात्र सत्ताबदलामुळे त्यात फारसा जोश नव्हता.
शरद पवारांसह बड्या नेत्यांनी फोनवरून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांचं अभिष्टचिंतन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
शिक्षण सोडावे लागेल का? एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 'उद्धव ठाकरे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो', अशा शब्दांत मोदी यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
साहेबांना त्रास नको म्हणून करणला समन्स नाही? कंगनाने आदित्य ठाकरेंना केलं लक्ष्य
तसंच, मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान म्हणतात की, वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे