कुठे आहेत सोनिया, प्रियांका? काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा

कुठे आहेत सोनिया, प्रियांका? काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा तळ ठोकून..

  • Share this:

मुंबई,18 ऑक्टोबर: महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांत विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा तर तळ ठोकून आहेत. उद्या, शनिवारी (19 ऑक्टोबर) हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. मात्र, तरीही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अजूनही महाराष्ट्रात एकही सभा घेतलेली नाही. एवढेच नाही तर प्रियांका गांधींनीहा महाराष्ट्रात फिरकल्या नाहीत. सोनिया आणि प्रियांका कुठे आहेत, अशी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

यंदाची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे राजकारणातील भविष्य ठरवणारी ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचीही एकत्रित सभा अद्याप झाली नाही. त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज महाराष्ट्रातील निवडणुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे, महायुतीने प्रचारसभांचा धडाका लावला आहे. सेना-भाजपा हे विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी अनेक सभा घेत फिरत आहेत. महायुतीची शुक्रवारी एकत्रित सभा आहे. अमित शहांच्या शु्क्रवारी गडचिरोलीसह विदर्भात चार सभा आहेत.

प्रदेशाध्यक्षांवर संपूर्ण निवडणुकीचा भार

विधानसभेत भाजप-शिवसेनेला सत्ता टिकवून ठेवायची आहे. त्यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या, गृहमंत्री अमित शाह यांनीही अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र, काँग्रेसचे बडे नेते या निवडणुकीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे राज्यात प्रचार सभा आणि रोड शोची मागणीही केली. मात्र, अद्याप ही मागणी अमान्य आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराचा संपूर्ण भार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर आला आहे. राहुल गांधी हे देखील ऐन निवडणुकीत परदेशात गेल्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ दोन प्रचार सभा घेतल्या.

हरियाणातील सभा सोनियांची रद्द

महाराष्ट्रासोबतच हरियाणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर भाजपसाठी जोरात प्रचार करत आहेत. मात्र, सोनिया गांधी हरियाणात प्रचार करणार असल्याची माहिती होती. मात्र, त्यांनी प्रकृतीमुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. महेंद्रगड येथे ही सभा होणार होती. राहुल गांधी यांनीही हरियाणात एक सभा घेतली. दरम्यान, लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेत आपली पकड मजबूत करण्याची काँग्रेसकडे संधी होती. मात्र, दोन राज्यांमध्ये इतक्या महत्त्वाच्या लढती असूनही काँग्रेसचे दिग्गज अजूनही प्रचाराच्या मैदानात उतरलेले नाहीत.

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading