'प्रिय मुंबईकर, मी येतोय...'; PM मोदींनंतर आता राहुल गांधींचा महाराष्ट्राकडे मोर्चा

'प्रिय मुंबईकर, मी येतोय...'; PM मोदींनंतर आता राहुल गांधींचा महाराष्ट्राकडे मोर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील रणनिती निश्चित झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील रणनिती निश्चित झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यामुळे काँग्रेसचा राज्यातून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील नेत्यांमधील वाद संपुष्ठात आणून निवडणुकीसाठी कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करण्याच्या दृष्टीने राहुल गांधी येत्या 1 मार्च रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

वाचा- राहुल गांधींची डोकेदुखी वाढली; महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी लोकसभा लढण्यास दिला नकार

राहुल गांधी यांची येत्या 1 मार्च रोजी मुंबई आणि धुळ्यात सभा होणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सभा घेतली होती. आता राहुल गांधी देखील धुळ्यातून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. धुळ्यासोबत राहुल गांधी मुंबईत सभा घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेची जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई काँग्रेसकडून 'प्रिय मुंबईकर, मी येतोय... आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण अवश्य या...' असे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी थेट मतदारांना संवादासाठी बोलवले आहे.

फोडणार प्रचाराचा नारळ

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढली जाणारी लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय, धुळ्यातील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी काय बोलतात याकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीची घोषणा केली आहे. भाजपविरोधात सध्या दोन्ही विरोधक एकत्र येताना दिसत आहेत.

वाचा- मी घाबरत नाही हाच मोदी आणि माझ्यात फरक-राहुल गांधी

धुळ्याचं महत्त्व

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील धुळ्यात जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला हजर होता. आता त्याच धुळ्यातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभेच्या प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहेत. शिवाय, महाराष्ट्र - मध्य प्रदेशच्या सीमेवरच धुळे येते. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपला पराभूत केलं होतं. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. 3 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुका आणि त्यामध्ये काँग्रेसला मिळालेला विजय यामुळे राहुल गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

VIDEO : युतीनंतर सोमय्यांविरोधातील आक्रमक शिवसैनिक थेट मातोश्रीवर, उद्धव ठाकरे म्हणतात...

First published: February 20, 2019, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading