मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती"

"काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती"

Saamana Editorial on Congress party: पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपालाही जिंकता येत नाही आणि भाजपलाही काँग्रेसचे टॉनिक लागते. हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार? असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Saamana Editorial on Congress party: पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपालाही जिंकता येत नाही आणि भाजपलाही काँग्रेसचे टॉनिक लागते. हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार? असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Saamana Editorial on Congress party: पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपालाही जिंकता येत नाही आणि भाजपलाही काँग्रेसचे टॉनिक लागते. हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार? असं अग्रलेखात म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 1 ऑक्टोबर : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून (Saamana Editorial) संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षात (Congress Party) सुरू असलेल्या उलथापालथवर बोट ठेवत आपलं मत मांडल आहे. काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अद्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस (Punjab Congress) फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपालाही जिंकता येत नाही आणि भाजपलाही काँग्रेसचे टॉनिक लागते. हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार? असं अग्रलेखात म्हटलं आहे.

काँग्रेसचे विसर्जन सुरू आहे काय?

अग्रलेखात पुढे म्हटलं, काँग्रेस पक्षाचे काय होणार, असा घोर अनेकांना लागला आहे. महात्मा गांधी त्यांच्या इच्छेनुसार काँग्रेसचे विसर्जन सुरू आहे काय?अशा आनंदाच्या उकळ्या भारतीय जनता पक्षात फुटत आहेत. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे काम उरले नाही व तिचे विसर्जन करावे, असे महात्मा गांधींचे सांगणे होते. ते तितकेसे खरे नाही. स्वातंत्र्यानंतर पन्नासेक वर्षे काँग्रेस सत्तेवर राहिली आणि आजही अनेक राज्यांत काँग्रेसचे बऱ्यापैकी अस्तित्व आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नाही. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे, भाजपच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाली व काँग्रेसच्या वाड्यातील उरलेसुरले वतनदारही सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा याक्षणी मुळापासून हादरला आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने बांगला केला, पण या उठवळ, बभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसपुढील संकट वाढवले.

'काँग्रेसमध्ये राहणार नाही आणि भाजपत....' अमरिंदर यांची मोठी घोषणा

सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना दूर केले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले? तिकडे 79 वयाचे अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. अमरिंदर हे भाजपात जातील असे सांगितले जात होते पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र, आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही असेही त्यांनी म्हटलेय. तेव्हा ते स्वत:चा नवा पक्ष स्थापन करुन काँग्रेसला खड्ड्यात टाकतील असे दिसत आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषी मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही असे मोदींचे धोरण आहे. अमरिंदर सिंग यांचे वय 79 आहे. तेव्हा ते कसे काय होणार? पंजाबमधील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वातही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही आणि हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करुन राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मिळणार केंद्रात जागा, BJP सोपवणार मोठी जबाबदारी?, भाजप नेत्याचा दावा

काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतलीय

जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असलीा तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाड्यातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी वाड्याची डागडुजी करू इच्छितात. वाड्याला रंगरंगोटी करू पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात पण जुने लोक राहुल गांधींना ते करू देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? असा सवालही विचारण्यात आला आहे.

First published:

Tags: Punjab, Shiv sena, काँग्रेस