Home /News /mumbai /

मराठी भाषेच्या मुद्दावरुन Congress आक्रमक, कार्यकर्त्यांनी अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या बोर्डला काळं फासलं

मराठी भाषेच्या मुद्दावरुन Congress आक्रमक, कार्यकर्त्यांनी अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या बोर्डला काळं फासलं

महाराष्ट्र सरकारने मराठी पाट्यांच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर उत्तर मुंबई युवक काँग्रेसने अ‍ॅपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नाव मराठी पाटी न लावल्याबद्दल त्यावर काळं फासलं.

    मुंबई, 23 जानेवारी : महाराष्ट्र सरकारने मराठी पाट्यांच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर उत्तर मुंबई युवक काँग्रेसने अ‍ॅपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नाव मराठी पाटी न लावल्याबद्दल त्यावर काळं फासलं. उत्तर मुंबई युवकचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड आणि त्यांच्या टीमने 20 दिवसांपूर्वी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्टमध्ये हॉस्पिटलकडून आकारण्यात येणारे सेवा शुल्क प्रदर्शित करून नावाचा फलक मराठीमध्ये बदलण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर उत्तर मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमधील नेम प्लेटवर स्प्रेने चोर लिहिलं. 'आम्ही 20 दिवसांपूर्वी इशारा दिला' "महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ निर्णय, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट आणि मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक खासगी कंपनी आणि रुग्णालयांना त्यांच्या नावाच्या पाट्या मराठीत करण्याचे आदेश आहेत. आम्ही त्याबाबत अ‍ॅपेक्स हॉस्पिटलला 20 दिवसांपूर्वीच इशारा दिला होता. हॉस्पिटलचा बोर्ड मराठी भाषेत असावा, असं सांगितलं होतं. पण तरीही हे चोर अॅपेक्स हॉस्पिटल मराठा सरकारच्या निर्णयाला धुडकावत आहे. महाराष्ट्रात राहून, व्यवसाय करुन मराठी अस्मिता आणि भाषेचा अपमान करत आहे. त्यामुळे उत्तर मुंबई काँग्रेसने या ठिकाणी येऊन धिंगाणा घातला", अशी प्रतिक्रिया प्रशांत गायकवाड यांनी दिली. मराठी पाट्यांवरुन राजकारण  महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर आता मराठी पाट्या (Marathi boards on shops) दिसणार आहेत. त्या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) गेल्या आठवड्यात घेतला आहे. या निर्णयावरुन राजकीय वातावरणही तापताना दिसलं होतं. महाविकास आघाडीसोबतच मनसेने (MNS) या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर एमआयएम, व्यापारी संघटनांकडून या निर्णयाला विरोध केला होता. याच मुद्द्यावरुन आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसेने आक्रमक होत मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना आपल्या खास स्टाईलमध्ये खळखट्याक इशारा दिला होता. दुकानदार असोसिएशनचाही विरोध दरम्यान, मराठी पाट्यांच्या या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने सुद्धा विरोध केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटलं, मराठी पाट्यांच्या सक्तीच्या विरोधात 2001 साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन या निर्णयाला स्टे देण्यात आला होता. आम्हाला मराठीचा अभिमान आहे पण दुकानाची मोठी पाटी ही इंग्रजीत असायला हवी की मराठीत हा दुकानदाराचा निर्णय आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं महाराष्ट्र दुकानावरील पाट्या मराठी असल्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करत हे श्रेय केवळ महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या