राज्यात एकत्र अन् मुंबईत संघर्ष? शिवसेनेच्या मागणीला काँग्रेसचा विरोध

राज्यात एकत्र अन् मुंबईत संघर्ष? शिवसेनेच्या मागणीला काँग्रेसचा विरोध

या अर्थसंकल्पात संपूर्ण मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे अशी मागणी राज्य सरकारकडे पाठवली असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेचा वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प बुधवारी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात संपूर्ण मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे अशी मागणी राज्य सरकारकडे पाठवली असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत 16 प्राधिकरण असून प्रत्येक कामासाठी वेगवेगळी प्राधिकरण आहे.

मुंबईत झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरण आहेत. परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा प्राधिकरण आहे. त्याव्यतिरिक्त एमएमआरडीए, एमएसआरडसी, बीपीटी एयरपोर्ट अथॉरिटी, एन एम आर सी एल, जिल्हाधिकारी,‌‌ रेल्वे केंद्र सरकार या जमिनी अशी विविध प्राधिकरणे काम करतात. त्यामुळे प्रत्येक प्राधिकरण स्वतःच्या अधिकारक्षेत्रात काम करत असताना मुंबईतील रस्त्याखाली असलेल्या पाईपलाइनची मोडतोड होते. परिणामी मुंबई महापालिकेचे नुकसान होते. शिवाय नगररचना करताना मोठी अडचण निर्माण होते.

हेही वाचा - ठाण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, हे प्रमुख 3 रस्ते आता ‘मॉर्निंग वॉक’साठी राखीव

सर्वांचे मिळून एकच मुंबई महापालिका प्राधिकरण असले तर बरं होईल आणि मुंबई महानगरपालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल अशी भूमिका महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मांडली आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या मागणीचे समर्थन केलं आहे. यामुळे मुंबईचा विकास करताना सोयीचे होईल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे.

काँग्रेसचा कडाडून विरोध

काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी शिवसेनेच्या या मागणीला कडाडून विरोध केलेला आहे. आता अस्तित्वात असलेली सर्व प्राधिकरणं काही विशेष कारणांसाठी म्हणून जन्माला आलेली आहेत. विशिष्ट घटकांचा विकास वेगाने व्हावा यासाठीही प्राधिकरण सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सगळ्या कारभार फक्त मुंबई महापालिकेच्या हाती द्यावा या भूमिकेला आमचा विरोध आहे, असं मत भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे. मुख्य म्हणजे यातील सर्वच प्राधिकरण ही काँग्रेसच्या राजवटीत सुरू करण्यात आलेली आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: February 4, 2021, 11:49 PM IST

ताज्या बातम्या