• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 80 वर्षांच्या कार्यकर्ताचा पक्षासाठी काम करतानाच शेवट; माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वीच मालवली प्राणज्योत

80 वर्षांच्या कार्यकर्ताचा पक्षासाठी काम करतानाच शेवट; माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वीच मालवली प्राणज्योत

गेली 30 वर्ष कॉंग्रेस भवनात ते काम करीत होते. आज माजी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने ते भवनात तयारी करीत होते.

  • Share this:
मुंबई, 1 ऑगस्ट : काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन सचिव उत्तम भूमकर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज आज दुपारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस भवनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, वृक्षारोपण असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या तयारीची पाहाणी करीत असताना भूमकर अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. (Congress office secretary Uttam Bhoomkar died of a heart attack this afternoon ) भूमकर यांच्या निधनाची वार्ता कळताच काँग्रेस भवनात श्रध्दांजली वाहून कार्यक्रम रद्द करण्यात आले. गेली 30 वर्ष कॉंग्रेस भवनात कार्यालयीन सचिव म्हणून भूमकर काम पाहात होते. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे ते माजी सदस्य होते. काँग्रेसज्येष्ठ नागरिक संघाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष होते. हे ही वाचा-संसदेत फक्त 18 तास झालं कामकाज, खोळंब्यामुळे जनतेचे 133 कोटी रुपये वाया त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उत्तम भूमकर नित्यनेमाने काँग्रेस भवनात काम करीत होते. आजही ते पक्षाच्या कार्यक्रमाची तयारी करीत होते. कार्यक्रमाची तयारी करीत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
Published by:Meenal Gangurde
First published: